pune sakal
पुणे

Pune News : पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण,आहुपे खोर्‍यामध्ये पितृपंधरवड्यामध्ये चांगलीच रेलचेल चालु आहे

सकाळ वृत्तसेवा

संतोष जाधव

भीमाशंकर - भाद्रपद पोर्णिमा झाल्यानंतर सुरु झालेल्या पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच कडाडले असुन तळेघर (ता.आंबेगाव) येथील आठवडे बाजारामध्ये आदिवासी बांधवांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण,आहुपे खोर्‍यामध्ये पितृपंधरवड्यामध्ये चांगलीच रेलचेल चालु आहे. आदिवासी पारंपारिक भाषेमध्ये यास काऊघास असे म्हणतात. आपल्या मृतवंशजाचे कायमचे स्मरण राहावे.यासाठी हिंन्दु धर्म संस्कृतीनुसार पितृपंधरवड्यामध्ये श्राद्ध करण्याची प्रथा परंपरेनुसार आजही चालु आहे.

ब्रम्हवृंदाने काढुन दिलेल्या तिथीच्या दिवशी महिला सकाळी लवकर उठुन विविध प्रकारचे पालेभाज्यांकरत नैवद्य तयार केला जातो. यानुसार केळींच्या पानामध्ये सकाळी नैवेद्य घेऊन घरातील कुटुंब प्रमुख आपल्या घराच्या आड्यावरती जाऊन आपल्या पुर्वजाला विनवणी करत कावळ्याला पाच वेळा आवाज दिला जातो.यानंतर कावळ्याने नैवद्य खाल्यानंतर प्रथमत:गावातील लहान मुलांना आवर्जुन बोलविले जाते.मुलांना उभे करुन त्यांचे पाय पुंजले जातात. यानंतर खरी भोजनावळ सुरु होते.ही पारंपारिक आदिवासी पद्धत आजही सुरु आहे. 

पितृपंधरावड्यामुळे दररोजच्या तुलनेत लागणार्‍या भाज्यांची स्वयंपाकातील गरज वाढल्याने पाले भाज्यांचे भाव वाढु लागले असल्याचे व्यापार्‍यांनी सकाळशी बोलतांना सांगितले यामुळे शेतकरी वर्गाला इतर पिकांनमध्ये एकीकडे कमी भाव मिळत असला तरी पालेभाज्या मधुन चांगलेच पैसे मिळण्याचा संधी मिळाली आहे भेंडी आळु , लालभोपळा, मेथी गड्डी, गवार किलो,देठ ,कारले हिरवी मिरची अळूची भाजी या भाज्यांना पितृपंधरवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात महत्व असुन या भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात मागण्या वाढल्या आहेत.  

पुर्वीच्या तुलनेत व महागाईच्या दृष्टीने पितृपंधरवडे घालण्याच्या पद्धतीत  मोठ्या प्रमाणात बदल होऊन विशेष करुन आवतणं हि पद्धत बंद होऊन फक्त पाहूणे जेवु घालण्यावर भर दिला जाऊन एक प्रकारची प्रथाच जोपासली जात आहे.या साठी मोठ्या प्रमाणात पदार्थ व पालेभाज्यांवर भर दिला जातो. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील एकमेव  तळेघर येथे भरणार्‍या आठवडे बाजारामध्ये पितृपंधरावड्यासाठी भाजीपाला खरेदी करण्यासाठी या भागातील आदिवासी बांधवांची झुंबड उडाली होती.

पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मोठ्या प्रमात दरही कडाडल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पोहचत असली तरी शेतकरी बांधवांच्या खिशात चार पैसे यंदाच्या पितृपंधरावड्यात जादा जाणार हे माञ नक्कीच.... 

भेंडी- मागील दर ४० ₹ किलो

सध्याचे दर ७५ ₹ किलो मेथी- मागील दर १० ₹ गड्डी

सध्याचे दर ५० ₹ गड्डी लाल भोपळा- मागील दर ४० ₹ किलो

सध्याचे दर ५५ ₹ किलो

गवार - मागील दर ४० ₹ किलो

सध्याचे दर ७५ ₹किलो

कार्ल - मागील दर ४० ₹ किलो

सध्याचे दर ७० ₹ किलो

हिरवी मिरची-मागील दर ४० ₹ किलो

सध्याचे दर ६०₹ किलो

देठ मागील दर २० ₹ किलो

सध्याचे दर ४० ₹ किलो

कोथंबिरी गड्डी मागील दर ५ ₹ गड्डी

सध्याचे दर ३० ₹ गड्डी आळु भाजी मागील दर १०₹ गड्डी

सध्याचे दर ३५ ₹ गड्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT