औंधमधील नियोजित दीड किलोमीटर अंतराच्या स्मार्ट रस्त्याचे रेखाचित्र. 
पुणे

योजना ‘स्मार्ट’ कधी?

सकाळवृत्तसेवा

केंद्रात सत्ताबदल झाल्यावर पहिला मोठा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला तो म्हणजे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा. देशातील पहिल्या २० शहरांत पुण्याची निवड झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जून २०१६ रोजी पुण्यातून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे राष्ट्रीय उद्‌घाटन केले. नव्या उपक्रमात आपले शहर सहभागी होत आहे, या भावनेने तब्बल सहा लाखांहून अधिक पुणेकरांनी आपल्या सूचना महापालिकेला कळविल्या. आता बदल होईल, असे नागरिकांना अपेक्षित होते. परंतु, पंतप्रधानांच्या हस्ते १४ प्रकल्पांचे उद्‌घाटन झाल्यावर लाइट हाउस, हॅपी स्ट्रीट, मी कार्ड, स्टार्ट हब, स्मार्ट पथदिवे आदी प्रकल्प मार्गी लागले. परंतु, पीएमपीच्या नव्या बस अजूनही दृष्टिक्षेपात नाहीत. २४ तास पाणी पुरवठ्याची योजना सुरू झाली, परंतु निविदा प्रक्रियेमुळे तिच्या मार्गात अनंत अडथळे येत आहेत. स्वयंचलित वाहतुकीसाठीचा प्रकल्पही निविदांच्या फेऱ्यांत अडकला आहे. शहरातील काही भागांतील पदपथ नव्या धोरणानुसार विकसित होत असला, तरी प्रशासकीय प्रक्रियेचा वेग धीमा असल्याचे दिसून आले. झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला. परंतु, पुनर्वसनाची मुहूर्तमेढ अद्याप रोवली गेलेली नाही. ‘जायका’ प्रकल्प मंजूर झाला परंतु, निविदा प्रक्रियेसाठी सल्लागार नियुक्त झालेला नाही.  
 

शहराचा स्मार्ट सिटीचा आराखडा सुमारे २९०० कोटी रुपयांचा आहे. गेल्या दोन वर्षांत स्मार्ट सिटीसाठी शहराला सुमारे २८३ कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाला आहे. स्मार्ट सिटीतील प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन केली असून, त्यातंर्गत ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ ही कंपनीही स्थापन झाली आहे. स्मार्ट सिटीतंर्गत सुरू झालेल्या योजनांची अंमलबजावणी एक ते दोन वर्षांत होणार आहे. २४ तास पाणी पुरवठा, यासारखी योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागू शकतात. 
 

यंदाच्या वर्षात पूर्ण होतील, अशा योजना

पीएमपीचे जीपीएसद्वारे नियंत्रण, प्रवाशांसाठी आणि महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी ‘मी कार्ड’, पथ दिव्यांसाठी कमांड अँड कंट्रोल रूम, शहरात वाय-फायचे २०० स्पॉट उभारणे, रस्त्यांचे पुनर्रचना, पादचारी पूरक रस्ते उभारणे (औंध आणि जंगली महाराज रस्ता), शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीचे स्वयंचलित नियमन करण्यासाठी स्मार्ट यंत्रणा, बालेवाडीमध्ये ट्रान्स्पोर्ट हब.

शहरात २४ तास पुरेशा दाबाने आणि समप्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यातंर्गत १०३ ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या उभारण्यात येत आहेत. या योजनेला वित्तपुरवठा व्हावा, यासाठी अल्पावधीत कर्जरोखे उभारण्यात येणार आहेत. तसेच जलवाहिन्या बदलतानाच केबल्ससाठी डक्‍टचीही निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात केबलसाठी रस्त्यांची खोदाई करावी लागणार नाही.

पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण सुरू झाले असून, पुरंदरमधील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठीही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. घोरपडी, लुल्लानगरमधील प्रलंबित उड्डाण पूल मार्गी लागले असून, चांदणी चौकातील बहुमजली उड्डाण पुलासाठी पूरक कामे सुरू आहेत. जायका प्रकल्प आता अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे, तर पीएमपीआरडीए पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहे. गेल्या तीन वर्षांत सुरू झालेल्या या प्रकल्पांमुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण करण्यावर गेल्या तीन वर्षांत भर दिला आहे. 
- अनिल शिरोळे, खासदार

स्मार्ट सिटी म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे, असे नाही तर तो एक घटक आहे. स्मार्ट सिटीतील स्वयंचलित पथदिवे,२४ तास पाणी पुरवठा, नदीसुधार, वाहतूक आदी प्रकल्पांमुळे नागरिकांच्या राहणीमानावर प्रभाव पडणार आहे. तसेच अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी इनोव्हेशन हब, स्टार्टअप हबमुळे २०२२ पर्यंत शहरात ५० हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल. त्यासाठी पुणे आयडिया फॅक्‍टरीचे धोरण पंधरा दिवसांत जाहीर होणार आहे. शाश्‍वत विकासासाठी नदी सुधार, हरित जागांचा विकास, पर्यावरण पूरक गृहप्रकल्प, सौर ऊर्जा आदी प्रकल्प होणार आहेत. यातून शहरातील नागरिकांच्या जीवनमानावर प्रभाव पडून शहर खऱ्या अर्थाने विकसित होणार आहेत.  
- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT