पुणे

महापालिकेच्या दाव्यावर "पाणी'; पावसाळ्याआधी गटारांची डागडुजी नाहीच 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पावसाळ्याआधी शहरभरातील पावसाळी गटारांची डागडुजी होईल. पावसाचा जोर वाढला तरीही लोकवस्त्या आणि वाहनांच्या वर्दळीच्या रस्त्यांवर कुठे पाणी साचणार नाही, असा महापालिकेचा दावा सोमवारच्या (ता. 21) पावसानेही खोटा ठरविला आहे. रस्त्यांशेजारच्या पावसाळी गटारांमधील गाळ, त्यावरील नादुरुस्त झाकणांमुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे पादचारी, वाहनचालक आणि काही भागांतील रहिवाशांचे हाल झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा व्हावा, यासाठी गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यवर्ती भागातील लोकवस्त्यांसह वर्दळीच्या रस्त्यांलगत सुमारे सातशे किलोमीटर लांबीची गटारे आहेत. त्यात नव्याने 11 भागांतही साडेतीनशे-पावणेचारशे किलोमीटर लांबीची गटारे बांधली आहेत. त्यामुळे ज्या परिसरात पाणी तुंबण्याची शक्‍यता होती; ती ठिकाणे पूर्णपणे सुरक्षित झाल्याची आशा होती. मात्र, सोमवारी झालेल्या पावसाने बहुतांश भागांत पाण्याची डबकी पाहायला मिळाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे, कोरोनाची साथ असल्याने यंदा पावसाळ्यात पूर्णपणे डागडुजीची कामे झाली नव्हती. त्यामुळे जुलैअखेर ओढे-नाले, गटारे दुरुस्त केले जातील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमवेत पाहणी केली; प्रत्यक्षात मात्र कामे झाली नसल्यानेच पावसाळ्यात जागोजागी पाणी साचत असल्याचे दिसून येत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे शहरातील रस्ते 
1 हजार 800 किलोमीटर 
पावसाळी गटारे 
700 किलोमीटर 
पाणी तुंबणारी गटारे (पाहणीचा अंदाज) 

पाणी तुंबलेली ठिकाणे 
जंगली महाराज रस्ता, डेक्कन, शिवाजीनगर गावठाण, शिवाजीनगर, नगर रस्ता, पुणे रेल्वेस्थानक, फडके हौद चौक, शिवाजी रस्ता, जेधे चौक पुणे-सातारा रस्ता, कर्वे रस्ता, सहकारनगर. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कामांची पाहणीच नाही 
शहरातील ओढ्या-नाल्यांसह पावसाळी गटारांची वर्षातून तीन वेळा देखभाल-दुरुस्ती अपेक्षित आहे. त्यानुसारच निविदा काढण्यात येतात. त्यात पावसाळ्या आधी म्हणजे मे महिन्यांत, त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर आणि पुन्हा जानेवारी-फेब्रुवारीत ही कामे करण्याचे नियोजन आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करूनच ठेकेदाराला त्याची बिले देणे अपेक्षित आहे. परंतु, ना कामे होतात, ना त्याची पाहणी; त्यामुळे पावसाळी गटरांची दुरवस्था झाल्याचे वस्तु:स्थिती आहे. 

पावसाळ्यात पूरस्थिती ओढावू नये, यासाठी खबरदारी घेऊन कामे केली आहेत. ज्यात ओढ्या-नाल्यासह गटारांची कामे झाली आहेत. मात्र, जिथे कुठे पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या; तेथे क्षेत्रिय कार्यालयांकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. 
- शांतनु गोयल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT