पुणे

आठ मिनिटांत पीएमपी चकाचक

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या १३ आगारांत बस धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात ही यंत्रणा उभारली जाऊ शकते. त्यामुळे पीएमपीची बस अवघ्या सहा ते आठ मिनिटांत धुतली जाणार आहे. 

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २००० बस आहेत. त्यातील १५५० ते १६०० बस दररोज मार्गांवर धावतात. बस दररोज स्वच्छ करण्यासाठी प्रत्येक आगारात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत; परंतु बस धुण्याची व्यवस्था नाही. त्यासाठी दोन ते तीन कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यांना बस आतून-बाहेरून धुण्यासाठी सुमारे एक तास लागतो. तसेच पाणीही मोठ्या प्रमाणात वाया जाते. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक आगारात बस धुण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने तयार केला आहे. त्याअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाची उपकरणे बसविली जातील. त्यातून सहा ते आठ मिनिटांत बस बाहेरून धुतली जाईल. बसचा आतील भागही स्वच्छ करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी एक कर्मचारी पुरेसा ठरेल.

हवेचा दाब नियंत्रित करून त्याद्वारे बस धुण्याची यंत्रणा सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्याचा समावेश आगारांत करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे सध्या वापरल्या जाणाऱ्या पाण्यात किमान ५० टक्के बचत होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत निविदा मंजूर करून याबाबतचे काम सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

पावसाळ्यात पीएमपीच्या बस दररोज धुतल्या जातात, तर एरवी एक-दोन दिवसाआड बस धुतल्या जातात. नव्या यंत्रणेमुळे बस दररोज धुणे शक्‍य होणार आहे. आवश्‍यकतेनुसार त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल; मात्र बस दररोज स्वच्छ केल्या जातील, असेही प्रशासनाने सांगितले.

स्वयंचलित यंत्रणेद्वारे बस धुण्यामुळे मनुष्यबळ आणि पाण्याची बचत होईल. आगामी काळात पीएमपीमध्ये बसची संख्या वाढणार आहे. त्या वेळीही ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. कालानुरूप पीएमपीमध्ये बदल होणे गरजेचे असून, त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. या यंत्रणेसाठीचा निधी पीएमपीकडे उपलब्ध आहे. 
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष, पीएमपी

बसची स्वच्छता हा प्रवाशांसाठी संवेदनशील मुद्दा आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासन प्रयत्न करत असले, तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे स्वयंचलित यंत्रणेद्वारे बसची स्वच्छता आवश्‍यक होती. तेरा आगारांत ही यंत्रणा बसविण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. 
- सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election : “तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?”; गोकुळच्या मतपेटीत सापडली संताप व्यक्त करणारी चिठ्ठी

NIKI PRASAD RECORD: पहिल्याच दोन चेंडूंवर दोन विकेट्स! निकी प्रसादने केला मोठा विक्रम; विराट कोहली-अजित आगरकरच्या यादीत स्थान

शक्तियों का गलत इस्तमाल! माजी आमदाराचा भाजपला रामराम; अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : गोकुळ मतमोजणी : सर्वसाधारण गटातील 1650 मतांची मोजणी पूर्ण, आमदार कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी

Beed Accident Case : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! रस्त्यावरील खड्ड्यामुळे कार हवेत उसळली अन् एसटीवर आदळली; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT