पुणे

टपाल कार्यालयांतही ‘आधार’मधील दुरुस्त्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी बदल यापुढे टपाल कार्यालयात करून मिळणार आहेत. त्यासाठी सर्व टपाल कार्यालयांत आधार अद्ययावत केंद्राची स्थापना केली जात आहे. पुणे जनरल टपाल मुख्य कार्यालयात हे केंद्र स्थापन करण्यात आले असून, गुरुवारी खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन झाले. महाराष्ट्र मंडल मुख्य पोस्टमास्तर जनरल एच. सी. अग्रवाल, पुण्याचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर उपस्थित होते.

आधार कार्डमधील बदल युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (यूडीएआय)च्या वतीने खासगी संस्था करून देत असत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व टपाल कार्यालयांमध्ये आधार अद्ययावत केंद्राची स्थापना करण्यास मान्यता दिली असून त्यानुसार केंद्रांची स्थापना केली जात आहे.

पोस्टाच्या २० कर्मचाऱ्यांना ‘यूडीएआय’कडून विशेष प्रशिक्षण दिले असून, हे कर्मचारी ४९७ पोस्ट कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील २० कार्यालयांत हे केंद्र स्थापले जातील. त्यानंतर १० जुलैपासून पुण्यासह अन्य चार जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू केली जातील.
- गणेश सावळेश्वर,पोस्टमास्तर जनरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT