Republic Day president medal sakal
पुणे

Republic Day : ‘सीजीएसटी’च्या पुण्यातील दोन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

नितीन गायकवाड यांना नुकतीच सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळाली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्ष २०२३ साठी असाधारण ‘गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल’ २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘विशेष प्रतिष्ठित सेवेसाठी’ प्रशंसा प्रमाणपत्रे आणि राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.

त्यामध्ये पुणे विभागातून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) विभागाच्या मुख्य आयुक्त कार्यालयातील अधीक्षक नितीन विनायकराव गायकवाड आणि पुणे-एक आयुक्तालयातील पुणे झोनचे अधीक्षक प्रशांत अरविंद रोहनेकर या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. नितीन गायकवाड यांना नुकतीच सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे.

गेली ३१ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. त्याबाबत भारत सरकारकडून हा सन्मान मिळाला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. माझे वडील विनायकराव विष्णू गायकवाड यांनाही १९८८ मध्ये हा सन्मान प्राप्त झाला होता. त्यामुळे या पुरस्काराचा विशेष आनंद आहे.

- नितीन गायकवाड, सहायक आयुक्त, मुख्य आयुक्त कार्यालय (सीजीएसटी)

भारत सरकारकडून हा सन्मान मिळाला, ही बाब गौरवाची आणि अभिमानास्पद आहे. या विभागात गेली ३१ वर्षे सेवा करीत असताना कष्टाचे चीज झाले, याचे समाधान वाटते.

- प्रशांत रोहनेकर, अधीक्षक, पुणे झोन (सीजीएसटी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT