पुणे

दिल्ली मेट्रोकडून प्राथमिक अहवाल

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोने या प्रकल्पास तत्वत: मंजुरी दिली आहे.

कंपनीकडून यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठपैकी कोणत्या मार्गांवर हा प्रकल्प राबविणे शक्‍य आहे, ते ठरविण्यात येणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने यापूर्वीच घेतला आहे. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ आता आठ मार्गांवर हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

पीएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पासाठी शहरातील आखणी आठ मार्ग प्रायोगिक तत्त्वावर निवडण्यात आले आहे. या मार्गांची पूर्वसुसाध्यता तपासणी करून त्यानंतर मार्ग निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्वसुसाध्यता तपासणीचे काम दिल्ली मेट्रोला देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात पीएमआरडीचे आयुक्त किरण गित्ते आणि दिल्ली मेट्रोचे अधिकारी यांची या प्रकल्पासंदर्भात प्राथमिक बैठक झाली. त्यात दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या आठही मार्गांचा पूर्वसुसाध्यता अहवाल तयार करण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. लवकरच पुन्हा एक बैठक घेऊन हे काम दिल्ली मेट्रो या कंपनीला दिले जाणार आहे. दिल्ली मेट्रोकडून यासंदर्भातील अहवाल तयार झाल्यानंतर हे मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहे. त्यानंतर निश्‍चित केलेल्या मार्गांचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.

सर्व मार्ग परस्परांना पूरक
पुणे महापालिकेकडून हाती घेण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांना जोडणारे हे आठ मार्ग असणार आहे. याशिवाय हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाला पूरक असे ते मार्ग असणार आहे. जेणेकरून शहरात मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभे राहण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

प्रस्तावित केले आठ मार्ग : 
शिवाजीनगर ते हडपसर 
वनाज ते हिंजवडी 
स्वारगेट ते खडकवासला 
चंदननगर - मगरपट्टा सिटी ते सोलापूर रस्ता 
चंदननगर ते वाघोली 
कोथरूड ते वर्षा पार्क( पाषाण) 
सिंहगड रोड ते कोथरूड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Natural Reservoir Bursts : ‘बिकट परिस्थितीतून नेपाळी सैन्याने वाचविले’; नेपाळी सैन्याच्या मदतीची नागरिकांनी केली प्रशंसा

Nasrapur Crime : सारोळा गावात थरार! पत्नीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून; आरोपी पतीला अटक

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळने नाकारली बचाव पथकांची मदत; नेपाळी सुरक्षा पथकांकडून शोध सुरूच

Truck Bike Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला! ट्रक-दुचाकीच्या अपघातात वडील-मुलीचा मृत्यू; आई गंभीर

Nepal Natural Reservoir Bursts : नेपाळमध्ये जलप्रलय! नैसर्गिक जलाशय फुटला; नेपाळ-चीन सीमेवरील भागांना पुन्हा पुराचा धोका

SCROLL FOR NEXT