भरत नाट्य मंदिर - "पुरुषोत्तम करंडक- 2017'चा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना नगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजचा संघ.
भरत नाट्य मंदिर - "पुरुषोत्तम करंडक- 2017'चा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना नगर येथील न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेजचा संघ. 
पुणे

'माइक'ने पटकावला अव्वलचा मान

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'पुरुषोत्तम करंडक- 2017'च्या महाअंतिम फेरीचा निकाल रविवारी (ता. 17) सायंकाळी जाहीर झाला आणि विद्यार्थ्यांनी करंडक कोणाचा... आव्वाज कोणाचा... अशी घोषणा देत जल्लोष केला. यात "माइक' या एकांकिकेने अव्वल स्थान पटकावले.

तत्पूर्वी, स्पर्धेतील तिसऱ्या भागाची सुरवात एक्‍स या एकांकिकेने झाली. यातून एक्‍स आणि वाय हे दोन्ही जगण्यासाठी अनुरूप असल्याचा संदेश देण्यात आला. त्यानंतर "अनुरागम' ही एकांकिका सादर झाली. स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेतून "शारीरिक प्रेम हे क्षणिक असते, तर मानसिक आधार असलेले प्रेम आजन्म टिकते,' असा संदेश देण्यात आला.

करंडक विजेती "माइक' एकांकिका त्यानंतर सादर झाली. रंगमंच तयार करणाऱ्या कारागिरांवर ही एकांकिका बेतलेली होती. या प्रयोगाला प्रेक्षक आणि परीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात 10 वैयक्तिक उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश एज्युकेशनचे सचिव शशिकांत वडोतकर, वास्तुविशारद अविनाश नवाथे, निखिल आगटे, मराठे ज्वेलर्सचे मिलिंद मराठे उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण डॉ. बाळकृष्ण दामले, अभिनेत्री अश्विनी गिरी, अभिनेते विद्याधर जोशी यांनी केले, अशी माहिती राजेंद्र नांगरे यांनी दिली. आयोजन अनंत निघोजकर, राजन ठाकूरदेसाई, मंगेश शिंदे, योगेश जाधव, अमृता पटवर्धन आणि शंकर उणेचा यांनी केले.

सर्वच एकांकिका दर्जेदार आणि उत्तम अभिनय, लेखन असणाऱ्या होत्या. विद्यार्थ्यांनी आजचे ज्वलंत विषय नाट्य माध्यमातून सरसपणे मांडले. ही पिढी जाती-पतीला विरोध करणारी आहे, हे यातून दिसून आले.
- डॉ. बाळकृष्ण दामले, परीक्षक

वैयक्तिक पारितोषिके -
अभिनय नैपुण्य स्त्री (प्रांजली किन्नरमठ - विवर (हीना) - श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली)
अभिनय नैपुण्य पुरुष (महेश गुरव - हिआरेथ (सायफर) - डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण)
सर्वोत्कृष्ट अभिनय पारितोषिक (ऐश्वर्या पंडित - देवबाभळी (लखूबाई) - चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली)

सांघिक पारितोषिके (एकांकिका) -
प्रथम - माइक (न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, नगर)
द्वितीय - देवबाभळी (चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली)
तृतीय - ए. एस. एल. प्लीज (पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे)
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक करंडक (विशेष) - एक्‍स (पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलच्या गोलंदाजीपुढे बेंगळुरूचे फलंदाज ढेपाळले; अर्धा संघ झाला बाद

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT