ragunath kuchik  sakal
पुणे

Pune news : रघुनाथ कुचिक यांचा जामीन न्यायालयाने केला रद्द

२४ वर्षीय तरुणीवर बलात्कार, जबरदस्तीने तिचा गर्भपात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करीत जबरदस्तीने तिचा गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांना देण्यात आलेला जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांना हा आदेश दिला.

जामीन देताना नमूद करण्यात आलेल्या अटींचे आरोपीने उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीला जामिनावर सुटण्याचा अधिकार नाही. न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा. तसेच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

२४ वर्षीय तरुणीवर बलात्कार, जबरदस्तीने तिचा गर्भपात आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना न्यायालयाने काही अटी व शर्तीवर ११ मार्च २०२२ ला जामीन मंजूर केला होता.

त्यातील काही अटी व शर्तीचे कुचिक यांनी पालन केले नाही, असा अर्ज मुलीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला होता. तसेच कुचिक यांना मिळालेला जामीन रद्द करावा म्हणून तिने अॅड. सागर शिंदे यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही कुचिक यांनी मुलीला मेसेज केला.

स्पीड पोस्टाद्वारे काही फोटो पाठवले. मुलीच्या घरी गेले, असे त्यात नमूद आहे. त्या अर्जावर अॅड. शिंदे यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कुचिक यांना दिलेला जामीन रद्द केला. ॲड. शिंदे यांच्यासोबत त्यांचे सहकारी अॅड. सुधीर शिंदे व अॅड. विशाखा जगताप यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT