Pune News: 
पुणे

Pune News: पावसाने केली वाघोलीकरांची दैना; महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी.

Chinmay Jagtap

Vagholi News: मंगळवारी झालेल्या धडाकेबाज पूर्व मोसमी पावसाने वाघोलीकरांची दैना उडविली. भर पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ आली.

मंगळवारी सायंकाळी वाघोलीत धडाकेबाज पाऊस पडला. या पावसाने पुणे नगर महामार्गावर कटकेवाडी पासून आव्हाळवाडी फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साचले होते. काही ठिकाणी तर पाणी ओढ्यासारखे वाहत होते.

या पाण्यामुळे वाहतूक तर मंदावलीच. मात्र दुचाकी धारकांनी या पाण्यातून वाट काढत जावे लागले. त्यामुळे त्यांचे हाल झाले. भावडी रोड वर पाण्याचे तळे साचले होते.

तर नगर महामार्ग व केसनंद रोडच्या मधील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. ते पाणी केसनंद रोड वर मोठ्या प्रमाणावर वाहत होते. यामुळे ही नागरिकांचे हाल झाले. याशिवाय अनेक सखोल भागात पाणी साचले होते.

पावसाने वाहतूक कोंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागले. पुणे नगर महामार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी महामार्गावर साचून राहते. महापालिकेने नाल्याची सफाई केली की नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. याबाबत महापालिकेचे अभियंता राजेंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.

वाघोली परिसरातील नाल्यांची पहाणी

वाघोली व परिसरातील नाल्यांची पाहणी 34 गाव विकास समिती सदस्य शांताराम कटके, संदीप सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, करण थोरात, पंडित डोंगरे, मोनिका कोरडे, आबिद शेख, कार्यकारी अभियंता राजेंद्र जाधव, उपअभियंता विनायक शिंदे, शाखा अभियंता मुस्तफा बासले, रुपाली वाळके व संबंधित विभागाचे कर्मचारी यांनी केली. या पाहणी दरम्यान नाले सफाई करण्याबाबत चर्चा झाली होती.

कामे सुरू होतील.

आचार संहिता मुळे कामे रखडली होती. आता नाले सफाई व अन्य कामे गुरुवार नंतर सुरू होतील असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे 34 गाव विकास समिती सदस्य संदीप सातव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT