पुणे

रिंगरोडला गती

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडच्या कामाची निविदा काढली आहे. या रस्त्याची लांबी ३३ किलोमीटर एवढी असणार आहे. निविदा भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आली आहे. यामुळे रिंगरोड मार्गी लावण्यासाठी पीएमआरडीएचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.  

पीएमआरडीएने प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. एकूण रोड १२३ किमी लांबीचा असणार आहे. 

यासाठी टीपी स्कीमचे मॉडेल राबविले जाणार आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग जोडण्याचा निर्णय घेतला होता. आंबेगाव खुर्द ते वाघोली असा पहिला टप्पा आहे. यासाठी सुमारे ६५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दहा पदरी असलेल्या रिंगरोडमध्ये सुरवातीला चार पदरी (चारलेन) सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) केला जाईल. त्यानंतर उर्वरित लेनचे काम केले जाणार आहे.

४२ रस्त्यांचा होणार विकास 
आंबेगाव खुर्द येथे एक बोगदा, मांगडेवाडी येथे दोन बोगदे आणि येवलेवाडी येथे एक बोगदा असणार आहे. पुणे जेजुरी आणि पुणे दौंड रेल्वे मार्गावर दोन पूल असणार आहेत. तर मुळा-मुठानदीवर एक पूल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या रोडला जोडणारे सुमारे ४२ रस्तेही प्राधिकरणाकडून विकसित केले जाणार आहे.

असा असेल रिंगरोड
रिंगरोडची एकूण लांबी १२३ किमी 
पहिला टप्पा ३३ किमीचा असणार 
रस्त्याची रुंदी ११० मीटर 
रिंगरोड दहा पदरी असेल  
पुणे-सातारा ते नगर रोड जोडला जाणार 
आंबेगाव खुर्द ते वाघोली असा रस्ता होणार 
टोल फ्री असणार रिंगरोड 
रिंगरोडला जोडणारे ४२ रस्त्यांचाही होणार विकास 
तीन बोगदे, रेल्वेमार्गावर दोन पूल आणि नदीवर एक पूल 
३३.४ किमीच्या रिंगरोडसाठी सुमारे ६५० कोटी खर्च अपेक्षित

पहिला टप्पा 
आंबेगाव खुर्द- मांगडेवाडी- पिसोळी-वडाचीवाडी-हांडेवाडी- होळकरवाडी-वडकी- उरुळी देवाची-कदमवाकवस्ती-मांजरी खुर्द- आव्हाळवाडी-वाघोली.

पहिल्या टप्प्यातील ३३ किलोमीटर लांबीचा रिंगरोड करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ३३ किलोमीटरच्या अंतरात ५ टीपी स्कीम करण्याचे नियोजन आहे. लवकरच त्याचाही इरादा जाहीर करण्यात येणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT