pune news  sakal
पुणे

Pune News : यंदाच्या भीमथडी जत्रेचे वेळापत्रक जाहिर

२१ ते २४ डिसेंबर २०२३  या कालावधीत भीमथडी पुण्यात भरणार

सकाळ वृत्तसेवा

 कल्याण पाचांगणे

माळेगाव - महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेल्या यंदाच्या भीमथडी जत्रेचे वेळापत्रक आज जाहिर झाले.  २१ ते २४ डिसेंबर २०२३  या कालावधीत पुण्यात ही भीमथडी जत्रा भरणार आहे, अशी माहिती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ  सुनंदा पवार यांनी स्पष्ट केली. 

अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था गेली पाच दशके कृषी , शिक्षण, जलसंधारण , प्रशिक्षणे, महिला बचत गट, महिला सबलीकरण आशा वेगवेगळ्या क्षेत्रामधे कार्य करीत आहे. यापैकी एक उपक्रम म्हणजे 'भीमथडी जत्रा' होय.   

ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांना उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, या मुख्य हेतूने ही भीमथडी जत्रा भरविली जाते. भीमथडी जत्रा यंदा १७ व्या वर्षात पदार्पण आहेत, अशी माहिती सौ. पवार यांनी सांगितली. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

भीमथडी जत्रेमुळे पुणे जिल्ह्यासह राज्यातील हजारो महिलांना आर्थिक सक्षम झाल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस त्यांच्या मधील व्यवसायिक आत्मविश्वास वाढवत आहे, असे सांगून सौ. पवार म्हणाल्या,`` अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट , भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने भीमथडी जत्रा भरविली जाणार आहे. 

२१ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये  कृषी महाविद्यालय मैदान शिवाजीनगर (सिंचननगर) पुणे येथे भीमथडी जत्रा आयोजित केली आहे. नावीन्यपूर्ण आकर्षण घेऊन येणारी यंदाची जत्रा भरडधान्यासह (मिलेट-नाचणी, राळ, सावा, भगर, सामा, वरई )वैविध्यपूर्ण वस्तू, नैसर्गिक शेतीतून उत्पादित होणारा माल,विविध प्रक्रिया उद्योगातील पदार्थ,अशी वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना घेऊन येत आहे. विशेषतः यंदा नवीन महिला बचत गटांनाही प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.

`` महाराष्ट्राची कलासंस्कृती (गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदी बैल), ग्रामीण खाद्य महोत्सव यासह  महिला बचत गटांनी बनविलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, मसाले पदार्थ , लोणची, कपडे, फळे, पालेभाज्या,धान्य,कडधान्य इत्यादी उत्पादने विक्रीस उपलब्ध होणार आहेत. यंदा देशातील व राज्यातील महिला बचत गट व महिला उद्योजिका यांना  ३१० स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या भीमथडीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील महिलांचे निवडक उत्पादनांचे सिलेक्ट दालन उभारले जाणार आहे. तसेच पर्यावरण, वाचवा संदेश अशी वेगवेगळी दालने आहेत. हायड्रोपोनिक्सची शेती, मातीविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, किचन गार्डन, मत्स्यव्यवसाय, पुष्परचना, मधाचे विविध प्रकाराच्या माहितीचे वैविध्यपूर्ण स्टॉल असतील, `` अशीही माहिती सौ. पवार यांनी स्पष्ट केली.

दुसरीकडे, पुण्यात भरविण्यात येणाऱ्या भीमथडी  जत्रेच्या नोंदणीसाठी व अधिक महितीसाठी ९० ६७ २७ ८३ २७  या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच www.bhimthadijatra.com यावरही संपर्क करावा, असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT