PMP bus 
पुणे

Pune News : दबक्या पावलांनी आला अन् बस घेऊन गेला; पुण्यात चोरट्याने PMP बस चोरली

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सारसबाग परिसरात सणस मैदानाजवळ पार्क केलेली पीएमपी बस चक्क चोरीस गेल्याची घटना घडली. पोलिसांनी शोध घेतला असता ही बस मार्केट यार्ड परिसरात आढळली. परंतु चोरट्याने जाताना बसमधील बॅटरी चोरून नेल्याचे समोर आले.

या प्रकरणी पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बसेस रात्री लष्कर भागातील पूलगेट स्थानकात लावण्यात येतात.

पालखी सोहळ्यामुळे पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा नसल्याने चालकाने सारसबाग परिसरातील सणस मैदानाजवळ बस लावली होती. परंतु बसलाच चावी असल्याचे पाहून चोरट्याने मध्यरात्री बस पळवून नेली. बस चोरीस गेल्याचे बुधवारी (ता. १४) लक्षात आल्यानंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता ही बस मार्केट यार्ड परिसरात सापडली. परंतु चोरट्याने जाता जाता बसमधील पाच हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली. तसेच, बसच्या काचाही फोडल्या. याबाबत पीएमपी सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बस चोरीच्या या घटनेमुळे पीएमपी बसेसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT