पुणे

Pune News: धक्कादायक! कुजलेल्या अवस्थेत सापडले बिबट्याचे शरीर!

सकाळ वृत्तेसवा

प्रकाश शेलार

Daund News: हद्दीमध्ये गरदडेवस्ती येथे शेतीच्या बांधावरती गुरुवार दिनांक ३० रोजी दुपारच्या सुमारास बिबट्या कुजलेल्या अवस्थेत सापडला.

सदर बिबट्या लक्ष्मण गरदडे व सर्जेराव गरदडे या शेतकऱ्यांच्या बांधावरती सापडला. गावातील आबासाहेब चोरमले व जगदीश गरदडे यांनी सर्वप्रथम या परिसरात दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली. त्यानंतर त्यांना सदर ठिकाणी बिबट्या मृत अवस्थेत सापडला.

अंदाजे ५ फुट लांब,२ फुट उंची असलेला मृत बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

चोरमले यांनी या संदर्भात वनविभागाला कळवले. सायंकाळपर्यंत वनविभागाचे कर्मचारी आल्याचे समजते. या संदर्भात आबासाहेब चोरमले म्हणाले की, खोपोडी येथे बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे.crime

. ४ दिवसांपूर्वी ग्रामस्थांना या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यानंतर आज मृत बिबट्याचे दर्शन झाले. विषबाधेमुळे किंवा उपासमारीमुळे सदर बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT