जगताप डेअरी - येथील वाकड फाटा वाय जंक्‍शनजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे संकल्प चित्र. 
पुणे

वाकडला होणार ‘सिग्नल फ्री’ प्रवास

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाकड येथील वाय जंक्‍शन अर्थात भुयारी मार्गाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना ‘सिग्नल फ्री’ प्रवास करता येणार असून, येथील रोजच्या वाहतूक कोंडीतून त्यांची निश्‍चितच सुटका होणार आहे. 

वाकड फाट्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीनेच या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या नोव्हेंबरअखेरीपर्यंत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे बीआरटी प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले. तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आलेल्या या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, सध्या शेवटच्या टप्प्यातील काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. 

हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणारा मोठा अभियंता वर्ग औंध, सांगवी परिसरात स्थिरावला आहे. त्यामुळे वाकड फाटा-जगताप डेअरी मार्गाचा वापर जास्त होतो. शिवाय पुणे-मुंबई द्रुतगती आणि पुणे-बंगळूर महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही या मार्गावर प्रवासी व मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. आयटीच्या विकासाबरोबर त्यात अधिकच भर पडत गेली. परिणामी, मार्ग अपुरा पडू लागला. वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढले. त्यातही वाकड फाट्याजवळील प्रश्‍न अधिकच गंभीर झाला. त्यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने महापालिकेतील बीआरटी विभागाने या ठिकाणी भुयारी मार्ग विकसित करण्याचा प्रकल्प आखला. 

प्रकल्पाचे स्वरूप - पुणे- वाकड रोड भुयारी मार्ग (अंडरपास)
एकूण खर्च - १७ कोटी
भुयारी मार्गाची एकूण लांबी - पाचशे मीटर (अर्धा किलोमीटर)
रुंदी - ७.५ मीटर

दोन महिन्यांत पूर्ण
दोन वर्षांच्या मुदतीतील या प्रकल्पाचे काम मे २०१६ मध्ये प्रत्यक्ष हाती घेतले. तीन टप्प्यांत त्याची आखणी झाली. पहिल्या दोन टप्प्यांतील काम वेगाने करण्यात आले. सध्या येथील सर्व्हिस रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. तर, जगताप डेअरीकडील रॅंपचे कामही नुकतेच संपले आहे. औंधच्या दिशेकडील काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत तेदेखील पूर्ण होईल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. 

या भुयारी मार्गाच्या विकासादरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, त्या दूर करत वेगाने काम पूर्ण करण्यावर आम्ही विशेष भर दिला. पुढील महिनाभरात प्रकल्प पूर्ण केला जाईल.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटी विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT