पुणे

"सीएमडीए'च्या प्रदर्शनात "स्मार्ट सिटी'ला प्रतिसाद 

सकाळवृत्तसेवा

पुणे - स्मार्ट सिटीचा सहभाग असलेले व "कॉंप्युटर अँड मीडिया डीलर असोसिएशन'ने (सीएमडीए) आयोजित केलेल्या "आयटी एक्‍स्पो' प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली. या प्रदर्शनात पुणे स्मार्ट सिटीने मांडलेल्या स्टॉलला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

स्मार्ट सिटीचे-रस्ते पुनर्रचना, स्थळनिर्मिती (प्लेस मेकिंग), लाईटहाउस, स्मार्ट एलिमेंट या पूर्ण झालेल्या, तसेच विकासकामे सुरू असलेल्या, आगामी, औंध-बाणेर-बालेवाडी स्थानिक विकास क्षेत्र व शहरातील इतर भागांतील (पॅन सिटी) प्रस्तावित प्रकल्पांची माहिती नागरिकांना स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांनी दिली. यामध्ये ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण, बॅनर व माहितीपत्रकांचा समावेश होता. 

स्मार्ट एलिमेंट प्रकल्पातील "पब्लिक ऍड्रेस सिस्टिम', "एनव्हॉयरन्मेंटल सेन्सर', "फ्लड सेन्सर', "इमर्जन्सी कॉल बॉक्‍स' आणि "वाय-फाय ऍक्‍सेस पॉइंट'चे प्रतिकृतींच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. वाकडमधील आयटी तंत्रज्ञांनी पुणे स्मार्ट सिटीच्या कामांची या वेळी प्रशंसा केली. स्मार्ट सिटीच्या वतीने व झूम कार "पेडल'च्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, तसेच औंधमध्ये सुरू करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाधारित सार्वजनिक सायकल सेवेतील एक सायकलही स्टॉलवर ठेवण्यात आली होती. या रंगीबेरंगी लक्षवेधी सायकलीमुळे पब्लिक बायसिकल शेअरिंगसारख्या अभिनव उपक्रमाची माहिती नागरिकांना मिळाली. 

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, ""औंध, बाणेर, बालेवाडी या स्थानिक विकास क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी स्मार्ट सिटीचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे स्मार्ट सिटीच्या कमांड कंट्रोल सेंटर, बिग डेटा सिस्टिममध्ये तसेच स्मार्ट सिटीची उपकंपनी पुणे आयडिया फॅक्‍टरीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रशासन व ई-गव्हर्नन्समध्ये अत्याधुनिक व नवीनतम आयटी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या उद्देशाने संबंधित आयटी सोल्यूशन्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर व तत्सम अत्याधुनिक सेवा पुरवणाऱ्या घटकांच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यास पुणे स्मार्ट सिटी उत्सुक आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT