Pune News 
पुणे

Pune : क्षेत्रीय कार्यालयाचा दणका! ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने सोसायटीला एक लाखाचा दंड

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कोंढवा (पुणे) : परिसरात दुर्गंधी पसरविण्यासाठी अनेकवेळा नागरी गृहरचना संस्था, सोसायट्याच जबाबदार ठरत असतात. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असते. अशाच प्रकारे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील राजगृही गृहरचना सोसायटीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडून आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण केल्याबद्दल सोसायटीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे, वरिष्ठ आरोग्यनिरिक्षक मंगलदास माने, विकास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ४१, काकडे वस्ती आरोग्य कोठी अंतर्गत येणाऱ्या प्रभागात आरोग्य निरिक्षक अभिजीत सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता नरेश शिंगटे, दयानंद तेलंगे, मिलिंद भोसले यांनी हा दंड वसूल केला आहे.

यापुढेही अशा प्रकारे परिसरात दुर्गंधी पसरविणाऱ्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रभारी मुख्य आरोग्य निरिक्षक विकास मोरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानात 2 दिवसांपूर्वी पेट्रोल स्वस्त, आज मोठी दरवाढ! भारतातही पेट्रोल-डिझेल महागणार?

Police Suspension News: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

AC चे तापमान २४ अंशांवर का ठेवावे?  'ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी'ने सांगितला महत्वाचा नियम!

Latest Marathi Update : - नाशिकमध्ये पुराच्या धोक्याचा अलर्ट

Brain Health: फक्त व्यायाम नाही! मेंदू निरोगी आणि तल्लख ठेवण्यासाठी 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा गोल्डन मंत्र

SCROLL FOR NEXT