Pune Station 
पुणे

Pune News: पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एका प्रवाशाचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पुणे - दिवाळीचा उत्सव सुरू झाला आहे. सोमवारी लक्ष्मीपूजन असून उद्या रविवार आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बसस्थानक, रेल्वस्थानक आणि खासगी बस थांब्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली आहे. त्यातच पुणे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. (Pune News in Marathi)

पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना चेंगराचेगरी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रवासी पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढत असताना ही दुर्घटना घडली.

बौद्ध मांझी (२१) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे. पुणे दानापुर एक्स्प्रेस गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असताना हा प्रकार घडला. दानापूर एक्स्प्रेस गाडी बिहार राज्यात जाते. दिवाळीमुळेया गाडीला मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय.

मृत बौद्ध मांझी हा देखील ही ट्रेन पकडण्यासाठी जनरल डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान शेकडो जणांनी त्या डब्यात शिरायचा प्रयत्न केला. यात मांजी खाली प्लॅटफॉर्म वर पडला. त्याचवेळी गर्दीने त्याला तुडवून टाकले.

दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी मांझी याची तपासणी केली, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT