pune university 
पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्‍न प्रलंबित

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वर्ग सोमवार (ता. १५) पासून सुरू होणार आहेत; पण विद्यापीठात शिकणारे बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था कशी करणार, हा प्रश्‍न कायम आहे. यावर शनिवारी (ता. १३) बैठक घेऊन नियमावली तयार करू, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या वेळी सोशल डिस्टन्सिंग राहावे, ५० टक्के उपस्थिती असावी, सुरक्षेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यांसह इतर सूचना केल्या आहेत. पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना सुमारे ५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतीगृहात राहातात. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या सुधारित नियमावलीमध्ये वसतिगृहातील खोली विद्यार्थ्यांना शेअरिंग करता येणार नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. 

पुणे विद्यापीठात विविध प्रकारच्या खोल्या आहेत. त्यामध्ये काहींमध्ये एक विद्यार्थी राहण्याची सोय आहे. तर काहींमध्ये दोन, तीन, चार आणि आठ जण राहू शकतील, अशा एकूण १ हजार २३६ खोल्या आहेत. त्यामुळे ‘यूजीसी’च्या नियमांचे कडक पालन केल्यास विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करणे अवघड आहे. 

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, ‘‘सोमवारपासून विद्यापीठात ज्ञानदान सुरू होईल. वसतीगृहामध्ये किती विद्यार्थी राहणार, त्यांची सोय कशी करणार याबाबत शासनाचे आदेश लक्षात घेऊन नियम तयार केले जातील. शनिवारी याबाबत बैठक घेऊन सविस्तर परिपत्रक काढले जाईल. 

विद्यार्थी 
वसतीगृह - ९ 
खोल्या - ७२१ 
क्षमता- २०१९ 

विद्यार्थिनी 
वसतीगृह - ९ 
खोल्या - ५१५ 
क्षमता- १४६५ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT