पुणे

अरे बापरे: अचानक घेतला गाडीने पेट; १२ चाकी मालवाहू वाहन आगीत जळून खाक

सकाळ डिजिटल टीम

Fire: आळेफाटा येथे १२ टायर मालवाहू वाहन आगीत जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळेफाटा(ता.जुन्नर)येथील सुर्यकांत शिंदे यांनी आपली एम.एच.१४ ई.एम.९५२७ हि १२टायर मालवाहतुक गाडी गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास ओतुर रोड वर असलेल्या राजू बेळगावकर यांच्या गॅरेजमध्ये लावुन घरी गेले होते .

रात्री २ वाजण्याच्या सुमारास अचानक पणे गाडी ने पेट घेतल्याने जवळच गॅरेज मध्ये झोपलेल्या कामगारांना जाग आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने जुन्नर या ठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले.

मात्र अग्निशमन वाहन जुन्नर हुन आळेफाटा ला पोहोचेपर्यंत मालवाहू ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला होता. तसेच या ट्रक ला आग नेमकी कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून घटनास्थळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे . दरम्यान आळेफाटा हे पुणे- नाशिक व नगर -कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गांला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असुन या ठिकाणी वहानांची मोठ्या दररोज प्रमाणावर खरेदी विक्री होत असते.

या परिसरात गेल्या २ वर्षात ५ वाहन जळीताच्या दुर्घटना घडल्या असुन या ठिकाणी मोठी बाजार पेठ,अनेक मोठाले दवाखाने असुन आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असल्याने पुढील काळात शासनामार्फत तातडीने अग्निशमन दलाची व्यवस्था न केल्यास मनसेमार्फत आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा आळेफाटा मनसे चे शहाराध्यक्ष सचिन गडगे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT