पुणे

स्वारगेट ते कात्रज मेट्रोही भूमिगत

सकाळवृत्तसेवा

पुणे - नियोजित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग भुयारी असेल. त्यानुसार कृषी महाविद्यालयाच्‍या मागील बाजू ते कात्रज हा दहा किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी होणार आहे. या कामांच्या हालचालींना महापालिका आणि महामेट्रोच्या पातळीवर गती मिळाली आहे. या मार्गाची पाहणी करून लवकरच त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गांची कामे सुरू झाली आहेत. त्यानुसार या मार्गांवर खांब (पिलर) आणि ‘क्‍लस्टर यार्ड’ उभारण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम करता येणे शक्‍य असल्याचे मेट्रो प्रकल्पाच्या तांत्रिक सल्लागाराने एका अहवालात म्हटले आहे. प्रस्तावित दोन्ही मार्ग उपनगरांना जोडून वर्तुळाकार मेट्रो उभारण्याचे नियोजन आहे.

कात्रज मार्गांची चाचपणी होणार
पहिल्या टप्प्यात कात्रजपर्यंत मेट्रो नेण्याचा प्रस्ताव करण्यात येत आहे. याबाबत राज्य सरकार आणि महापालिका यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून, त्याच्या अहवालासाठी सुमारे ३० लाख रुपये देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. महामेट्रोच्या प्रमुख अभियंत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने स्वारगेट-कात्रज मेट्रोच्या मार्गांची चाचपणी करण्यात येणार आहे.

जमिनीची कंपन चाचणी
मूळ पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील खडकी येथील अंडी उबवणी केंद्रापासून स्वारगेटपर्यंतचा पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. त्यासाठी जमिनीची ध्वनी आणि कंपन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ कात्रजपर्यंतच्या मार्गाचीही चाचणी होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

भुयारी मार्ग तांत्रिकदृष्ट्या सोयीचा
शिवाजीनगर ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. या मार्गावरील मेट्रो कात्रजपर्यंत नेण्याचे नियोजन असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे. स्वारगेटपर्यंत भुयारी मेट्रो असल्याने त्यापुढील टप्पाही याच पद्धतीने करणे तांत्रिकदृष्ट्या सोयीचे असेल. याबाबत महापालिकेतील पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली आहे. पुढील कार्यवाही वरिष्ठ पातळीवर होईल, असे महामेट्रोच्‍या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

IND vs SLC XI Warm-Up: देवदत्त पडिक्कलचे अर्धशतक, तरीही पहिल्या कसोटीत संधी मिळणे अवघड; कारण 'तो' येतोय, नेमकं काय शिजतंय?

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Latest Marathi News Live Update : "मोदी गद्दारांना सांगतायत, भीऊ नका मी पाठीशी"- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT