पुणे

तळेगाव-चाकण लिंकरोड लवकरच

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन - तळेगाव व चाकण औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा साडेचार किलोमीटर लांब व ७५ मीटर रुंदीचा चौपदरी जोडरस्ता (लिंकरोड) केला जाणार आहे. त्याच्या कामाची सुमारे साडेदहा कोटी रुपयांची अंतिम निविदा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळेगाव एमआयडीसी टप्पा एकमधून सुरू होणार लिंकरोड पुढे पॉवरग्रीड स्टेशन- नॉर्मा कंपनी- हनुमान मंदिराजवळून मिंडेवाडी मार्गे शिंदेवासुली शिवारातून चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील फोटॉन कंपनीजवळ जोडला जाणार आहे. या कामात अडथळा ठरणारे विजेचे टॉवर हटविण्यासाठी पॉवरग्रीडकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यासाठी लागणारी रक्कम एमआयडीसीने भरल्यानंतर टॉवर हटविले जाणार आहेत. हा लिंकरोड साधारणतः ७५ मीटर रुंदीचा असेल. 

तळेगाव एमआयडीसी टप्पा दोनच्या संपादित क्षेत्रामधूनच प्रस्तावित रस्त्याचा बहुतांशी भाग जाणार आहे. त्यासाठी नव्याने भूसंपादनाची गरज नसेल. मात्र, नवलाख उंबरे गावाच्या पूर्वेकडील करंजविहिरे रस्त्यालगत नदीजवळील साडेचार हेक्‍टर जागा एमआयडीसीला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी खरेदीखताची एमआयडीसीची तयारी असून त्यासाठीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. सदर कामाची १०.४७ कोटींची निविदा १२ टक्के कमी दराने एका कंत्राटदाराने भरली असून ती अंतिम मंजुरीसाठी पाठविल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खेड व मावळला फायदा
तळेगाव व चाकण एमआयडीसी जोडणारा लिंकरस्ता पूर्णत्वास आल्यानंतर खेड आणि मावळ तालुक्‍यांना व लगतच्या नागरीक्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. मुंबई-चाकण दरम्यानची अवजड वाहतूक भविष्यात या रस्त्यावरून वळविल्यास नेहमीच्या कोंडीतून तळेगाव आणि चाकणकरांना दिलासा मिळू शकेल. निविदा मंजुरीनंतर साधारणतः दहा महिन्यांत काम पूर्ण होईल, असा अंदाज एमआयडीसीचे उपविभागीय अधिकारी अजित देशमुख यांनी वर्तविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजला आली लहर, केला कहर! भारताचे २५० धावांचे विक्रमी लक्ष्य सहज पार केले, शे होपचे नाबाद शतक

Delhi Protest: 30 हजार जवान तैनात अन् 200 जण ताब्यात; CJPच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत काय-काय घडतंय?

IND vs WI 2nd T20I: W,W,W! ज्याने आस दाखवली, त्यानेच माती खाल्ली; Mayank Yadav च्या चूकीने मॅच गेल्यात जमा, नेमकं काय घडलं?

Ganja Farm Seized : गाढेजळगाव शिवारात गांजाची शेती उघड; ४३० झाडे जप्त, १८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, शेतकरी आरोपीला अटक

Rahul Gandhi Vote Theft : 'राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे'; राहुल गांधींचा मोठा दावा, CEC ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

SCROLL FOR NEXT