hadapsar  sakal
पुणे

Pune News : गृहनिर्माण सोसायटीमध्येही स्थापन होणार तंटामुक्ती समिती : उपनिबंधक संजय राऊत

सहकार विभाग, सावली फाउंडेशन आणि सप्तसिध्दी असोसिएट यांच्या वतीने ससाणेनगर येथे "डिम्ड कन्व्हेन्स आणि इमारत पुनरनिर्माण' या विषयाव कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कृष्णकांत कोबल

हडपसर - गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये किरकोळ स्वरूपाचे अनेक वाद होत असतात. ते मिटवण्यासाठी सभासद थेट उपनिडबंधक कार्यालयाची पायरी गाठतात. यामध्ये सभासदांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे हे वाद मिटवण्यासाठी गाव पातळीवरील तंटामुक्ती समितीप्रमाणे सोसायट्यांमध्येही अशी तंटामुक्ती समिती नेमण्याचा सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती शहर-जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी दिली.

सहकार विभाग, सावली फाउंडेशन आणि सप्तसिध्दी असोसिएट यांच्या वतीने ससाणेनगर येथे "डिम्ड कन्व्हेन्स आणि इमारत पुनरनिर्माण' या विषयाव कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी गृहनिर्माण सोसायटी पदाधिकारी व सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, आर्किटेक अतीत अदमुलवार, विधीतज्ञ अनिल तांबे तसेच, संजय ससाणे, वैभव माने, प्रथमेश ससाणे आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यशाळेत हडपसर परिसरातील २०८ सोसायटी प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी वर्धमान टाऊनशिप, निर्मल टाऊनशिप, गांगा व्हीलेज, फोश सहकारी सोसायटीच्या सभासदांनी डिम्ड कन्व्हेन्स आणि इमारत पुनरनिर्माणच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले होते.

उपनिबंधक राऊत म्हणाले, "कन्व्हेस्ट डीड करण्याकरिता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार विभागासोबत संपर्क केला पाहिजे. जुन्या मोडकळीस आलेल्या सोसायट्या कागदपत्रांची पूर्तता करून स्वतः पुनरनिर्माणचा निर्णय घेऊ शकतात.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT