पुणे

पीएमआरडीएकडून कार्यक्षेत्राचा वाहतूक आराखडा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या सात हजार २०० चौरस किलोमीटर क्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, एल ॲण्ड टी इन्फ्रास्ट्रक्‍चर इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आला आहे. या मार्गाला जोडणाऱ्या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी पीएमआरडीएकडून आठ मार्ग निश्‍चित करण्यात आले होते. या मार्गाबाबत पीएमआरडीएने दिल्ली मेट्रोकडे विचारणा केली होती. या आठ मार्गांऐवजी संपूर्ण कार्यक्षेत्राचा वाहतूक आराखडा तयार करावा, त्यानंतर मेट्रोसाठी अन्य मार्गांची त्यातून निवड करावी, अशा सूचना दिल्ली मेट्रोने पीएमआरडीएला दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएने संपूर्ण परिसराचा वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन हे काम एल ॲण्डी टी कंपनीला देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे.

येत्या आठ ते दहा दिवसांत संबंधित कंपनीला पीएमआरडीएकडून या कामाची वर्कऑर्डर दिली जाणार आहे. पुढील अठरा महिन्यांत संबंधित कंपनीने संपूर्ण कार्यक्षेत्राचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे बंधन पीएमआरडीएकडून घालण्यात आले आहे. त्यामध्ये हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गाव्यतिरिक्त अन्य कोणत्या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविता येईल, या शिवाय मोनोरेल, हायपरलूप यांचा वापर करता येईल तसेच कार्यक्षेत्राच्या हद्दीत कोणत्या भागात जलवाहतूक करणे शक्‍य आहे, आदीचा विचार करण्यात येणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाव्यतिरिक्त मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेणे शक्‍य असलेल्या अन्य मार्गाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT