Pune Accindet  sakal
पुणे

Pune News: दुर्देवी घटना, टँकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू !

Maharashta News | स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे संताप असून रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे |

विठ्ठल तांबे

Pune News: सिंहगड रस्त्यावरील वडगाव येथील प्रयेजा सिटी समोरील रस्त्यावर आज सकाळी एका महिलेचा रेडी मिक्स सिमेंट टँकर खाली चिरडून मृत्यू झाला.

धायरी आणि वडगाव मध्ये सिमेंट काॅंक्रिट तयार करणारे सिमेंट प्लांट आहेत. या प्लांट मधून नेहमी भरधाव वेगाने मिक्स सिमेंट टँकर चालवले जातात. काहीदा टॅंकर चालक मद्यपान करून टॅंकर चालवतात. त्यामुळे यापूर्वीही अपघात झाले आहेत.

लांबट आकाराचा टॅंकर (एमएच १२ एस एक्स ९४६४) उताराच्या रस्त्यावरुन खाली जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून तो अचानक वळला असावा आणि अपघात असावा असा अंदाज आहे.‌अपघातानंतर चालक पळून गेला. बघ्यांची गर्दी होऊन त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर टॅंकर किंवा ट्रक यावर निर्बंध आहेत. तरीही संबंधित टॅंकर मालक ते झुगारून देतात. अशा बेपर्वाईमुळे आज एका निष्पाप महिलेचा जागीच बळी गेला. स्थानिक रहिवाशांमध्ये यामुळे संताप असून रस्ता अवजड वाहनांना बंद करण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar : ठाकरेंची साथ सोडताच ओमराजे निंबाळकरांना मोठा झटका! हजारो फॉलोवर्स घटले, सोशल मीडियावर युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Solapur Weather: उन्हामुळे शाळा भरणार सकाळच्या सत्रात; साेलापुरच तापमान ३८ अंशांवर; संचालक म्हणाले, ‘चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय’

Shreyanka Patil ची माघार अन् टीम इंडियाच्या तीन वेगवेगळ्या संघात करावे लागले बदल; BCCI च्या मेलमध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय वाचा...

श्रद्धा कपूरचा 'ईथा' सिनेमातील फर्स्ट लूक लीक! ९ महिन्यांच्या गरोदरपणातील विठाबाईंचा संघर्ष पाहून चाहते थक्क

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘सारथी’ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित, शैक्षणिक शुल्कावरील कमाल मर्यादा हटविली

SCROLL FOR NEXT