मोशी - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील ब्रेक चाचणी घेताना. 
पुणे

मोशीत वाहनांची ब्रेक चाचणी ट्रॅक सुरू

श्रावण जाधव

मोशी - वाहनांची ब्रेक चाचणी करणारा ट्रॅक मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे. 

मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ब्रेक चाचणी ट्रॅक व्हावा अशी मागणी होती. ट्रॅक नसल्याने वाहनचालकांना पुण्यात जावे लागत होते. तसेच, येथील विविध चाचण्या इमारतीसमोरील वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरच कराव्या लागत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कार्यालयाच्या मागील बाजूस सुमारे एक कोटी रुपये खर्च करून २८० मीटरचा ब्रेक चाचणी ट्रॅक उभारण्यात आला आहे. ब्रेक चाचणीबरोबरच वाहनांचे इंजिन, स्टिअरिंग, हेडलाइट, टेललाइट, रिवर्स गिअर, वायफर्स आदींच्या चाचण्या घेण्यात येतात. तसेच, वाहनांचे पासिंग व शिकाऊ वाहनचालक परवाना बुकिंग, फी आकारणीही ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.

वाहनांच्या दृष्टीने ब्रेक चाचणी ही अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे शहरानंतर फक्त याच कार्यालयामध्ये असा ट्रॅक असल्याने जिल्ह्याच्या विविध भागांमधून वाहनचालक ही चाचणी करण्यासाठी येत आहेत. दिवसभरामध्ये तीनशेहून अधिक वाहनांची ब्रेक चाचणी करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारत-पाकिस्तान 'सुवर्ण' लढत! श्रीलंकेला लोळवून श्रेयस अय्यरचा संघ फायनलमध्ये; केव्हा होणार हा महामुकाबला?

पत्ता बदलण्यासाठी Form 8 भरला अन् कुटुंबातील सहा सदस्यांची नावेच गायब; SIR प्रक्रियेवर मुंबई हायकोर्टाचा सवाल, कायदा पाळण्याची तंबी

Wicknell Chivayo Death : झिम्बाब्वेत हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; जगप्रसिद्ध उद्योगपती विकनेल चिवायोसह सहा जणांचा मृत्यू

Jio ची मोठी ऑफर! 6 महिन्यांचा रिचार्ज आणि 14GB डेटा मिळणार फ्री; 'या' युझर्सना होणार फायदा...

Latest Marathi News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे क्राईम ब्रँचकडून तीन महिला ताब्यात

SCROLL FOR NEXT