एनसीसीचे कार्यालय, सेनापती बापट रस्ता -  महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात पथसंचलन करताना छात्र.
एनसीसीचे कार्यालय, सेनापती बापट रस्ता - महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात पथसंचलन करताना छात्र. 
पुणे

युद्धकलेचे धडे अन्‌ थरारक कवायती

सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीय छात्र सेनेच्या २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच झाला. या शिबिरात सिनिअर आणि ज्युनिअर विंगच्या सुमारे ४५० छात्रांनी सहभाग घेतला होता. युद्धकलेपासून ते थरारक कवायतींच्या प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक उपक्रमात छात्रांनी सहभाग नोंदवत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

दहा दिवस सेनापती बापट रस्त्यावरील राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्य कार्यालयात घेतलेल्या या शिबिरात २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या छात्रा सहभागी झाल्या होत्या. व्याख्याने, चर्चासत्र, कवायतींची प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रम या शिबिरात आयोजित केली होती. 

ग्रुप कमांडर ब्रिगेडिअर सुनील बोधे, डेप्युटी ग्रुप कमांडर कर्नल आर. एल. हणगी, ट्रेनिंग ऑफिसर कर्नल आर. जे. एस. चावला यांनी शिबिराचे संयोजन केले होते. शिबिराला कमांडिंग ऑफिसर ओ. पी. पांडे, डेप्युटी कॅम्प कमांडर कॅप्टन कनकलता चौरे, बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनुज चनन, ३६ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. एस. दिनसा, ॲडम ऑफिसर मेजर उदयराज सिंग, ९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल वाय. एस. गणेश, ॲडम ऑफिसर कर्नल एस. जे. शर्मा, ३८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अविनाश कोल्हे, लेफ्टनंट कर्नल एस. बंडखडके, ३ महाराष्ट्र आर्म्ड ऑफिसर कमांडिंग कर्नल सौरभ मिश्रा, लेफ्टनंट कर्नल प्रशांत वाघमारे, विंग कमांडर सी. वाय. महाजन आणि कॅप्टन सुरेश कुमार आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT