tomato  sakal
पुणे

Pune News : मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्याचा इशारा

शेतकऱ्यांना भीक नको. त्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

रवींद्र पाटे

नारायणगाव - टोमॅटो, कांदा महाग झाल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून टोमॅटो आयात केली.कांद्यावर वर निर्यात शुल्क लागू केले. टोमॅटो खरेदी करून ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून दिले. आता टोमॅटोचे भाव मातीमोल झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने किमान पंचवीस रुपये प्रति किलो या दराने टोमॅटो खरेदी करावित. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम व शिवसेनेचे तालुकाप्रमुख( ठाकरे गट) माऊली खंडागळे यांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आज(ता.18) सकाळी नारायणगाव येथील टोमॅटो बाजारात माजी सभापती देवदत्त निकम, तालुकाप्रमुख खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे,सचिन थोरवे,संदेश खंडागळे, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ वाळुंज,बाजार समितीचे संचालक सारंग घोलप आदी मान्यवर टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

देवदत्त निकम म्हणाले शेतकरी हितासाठी व विकासासाठी मंत्रिमंडळात सहभागी झालो असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील देत आहेत.

त्यांचे व पंतप्रधानांशी चांगले संबंध आहेत. यामुळे सहकार मंत्री वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांनी पंतप्रधान व केंद्रीय कृषिमंत्री यांची भेट घेऊन कांदा उत्पादक व टोमॅटो उत्पादकांचे प्रश्न सोडवावेत.

निकम पुढे म्हणाले केंद्रात व राज्यात घोषणा करणारे व शेतकरी विरोधी सरकार आहे. जुन्नर व मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा अनुदानाची सुमारे 19 कोटी रुपयांची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. नाफेड मार्फत चोवीस रुपये दहा पैसे दराने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली.मात्र अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर शासनाने टोमॅटो खरेदी केली. मात्र भाव कमी झाल्यानंतर कोणती उपाययोजना केली जात नाही. शासनाने टोमॅटो उत्पादकांना अनुदान द्यावे. 25 रुपये प्रति किलो या दाराने टोमॅटो खरेदी करावीत. अन्यथा मुंबई येथे मंत्रालयावर टोमॅटो मोर्चा काढण्यात येईल.

खंडागळे म्हणाले शेतकऱ्यांना भीक नको. त्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम मंत्री करत आहेत.राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो नारायणगाव येथे विक्रीसाठी घेऊन येण्याची वेळ आली आहे. भांडवली खर्च विचारात घेता टोमॅटो क्रेटला किमान 400 ते 500 रुपये भाव मिळणे आवश्यक आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे खांडगे, वाळुंज,थोरवे यांनी मनोगत व्यक्त केले.

@ देवदत्त निकम (माजी सभापती) : एक ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जातील. टोमॅटो आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची महाकोंडी! पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प, प्रवास ठरतोय शिक्षा!

Latest Marathi News Live Update : संस्थानासाठी ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावला येणार

Pune News: वनविभागाच्या जमिनींची पडताळणी सुरू! पुणे जिल्ह्यात ‘एसआयटी’मार्फत तपासणी; सरकारला सादर करणार अहवाल, नेमंक काय कारण?

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

SCROLL FOR NEXT