पुणे

गावपातळीवर मिळणार हवामानाचा अंदाज - डॉ. हर्ष वर्धन

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘मॉन्सून, जलवायूचा अंदाज ‘प्रत्युष’ या सुपर कॉम्प्युटरमुळे अधिक अचूकपणे वर्तविता येणार आहे. तसेच, गावपातळीवरील हवामानाचा अंदाज देणेही शक्‍य होणार आहे. याद्वारे आगामी दोन वर्षांत देशातील जवळपास ९.३ कोटी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारा संदेश पाठविण्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे,’’ असे मत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान, भू-विज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतर्फे (आयआयटीएम) ‘प्रत्युष’ या देशातील पहिल्या मल्टी पेटाफ्लॉप्स सुपर कॉम्प्युटर एचपीसी प्रणालीचे उद्‌घाटन डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते झाले.

या वेळी खासदार अनिल शिरोळे, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन, आयआयटीएमचे संचालक प्रा. रवी एस. नन्जुनडैया, प्रकल्प संचालक डॉ. सूर्यचंद्र राव आदी उपस्थित होते. 

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, ‘‘देशातील जवळपास २.४ कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हवामानाचा अंदाज वर्तविणारा संदेश पाठविल्यामुळे दरडोई उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. ‘प्रत्युष’च्या साहाय्याने उष्णतेची लाट, चक्राकार स्थिती, त्सुनामी, वीज पडणे, अतिवृष्टी असे हवामानविषयक अंदाज अचूकपणे देणे शक्‍य होणार आहे. एचपीसी या प्रणालीच्या साहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जपान, युनायटेड किंगडम, अमेरिका या देशांनंतर भारत चौथ्या क्रमांकावर पोचला आहे. जवळपास ४५० कोटी रुपयांच्या निधीतून ‘प्रत्युष’ची निर्मिती झाली आहे.’’

‘‘सर्वसामान्य नागरिकांसाठी विज्ञान कसे उपयुक्त ठरेल, यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न करण्यात येत आहेत. अवकाश निरीक्षणासाठीची जगातील सर्वांत मोठी दुर्बीण बनविण्यासाठी केंद्र सरकारने १३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, ‘डिजिटल भारत’ साकारण्यासाठी १० लाख किलोमीटरच्या ऑप्टिकल फायबरच्या केबलचे जाळे पसरविले आहे. याद्वारे हजारो गावांमध्ये इंटरनेट पोचले आहे. नव्या भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविताना ‘सायंटिफिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी’वर भर दिला जाणार आहे,’’ असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात ‘प्रत्युष’ वेबपोर्टलचे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी एम. राजीवन यांचेही भाषण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT