डॉ. नीलम गोऱ्हे  sakal
पुणे

सर्व क्षेत्रात महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक : नीलम गोऱ्हे

‘महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग असून, सर्व क्षेत्रात महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ‘महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवारी (ता. ४) महिलांची सुरक्षितता व महिला सक्षमीकरण अंतर्गत महिलांचे समुपदेशन’ या विषयावर चर्चासत्रात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, येत्या २०३० पर्यंत सर्व क्षेत्रात ५० टक्के महिला असाव्यात, यादृष्टीने सर्व महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व घटनांमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे आपण स्त्रीचे म्हणणे ऐकायला शिकले पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रिया जेव्हा अन्यायाबाबत सांगतात तेव्हा कोणत्या कायद्यातून आधार मिळू शकतो, याबाबत उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी केशरी दिवस संस्कृती व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका आणि महिलांचे हक्क याबाबत माहिती दिली. वैशाली वढे, अनिता परदेशी, अंजली कुलकर्णी यांनी अनुभव कथन केले. तर, विभावरी कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT