Nitin Gadkari  esakal
पुणे

सोसायट्यांची व्यथा गडकरींना ऐकवताच आली नाही

मुंबईत ते सातारा या महामार्गाचे रुंदीकरण करताना मुख्यरस्त्यासह सर्व्हिस रस्ता केला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे रस्ता रुंदीकरणाचा फटका महामार्गालगतच्या सोसायट्यांना बसला आहे. दिवसरात्र धावणाऱ्या वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण,वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे. त्यावर उपाय योजना कराव्यात. येथील रहिवास्यांना दिलासा द्यावा या मागणीचे निवेदन घेऊन बावधन सिटीझन फोरमचे काही सदस्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटायला आले. पण पोलिसांनी त्यांना अडविल्याने गडकरींपर्यंत ते पोहूच न शकल्याने कैफियत मांडू शकले नाहीत.

महामार्ग रुंदीकरण व उड्डाणपुलाच्या कामामुळे सॅफरॉन अव्हेन्यू, रामनदी कॉपरेटीव्ह सोसायटी, कुणाल बेलेझा, प्रिस्टीम फोंटाना,फ्लेमिंगो, झिनिया या सोसायट्यांमधील रहिवाश्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी या भागातील काही रहिवासी गडकरी यांना भेटून निवेदन देण्यासाठी आले होते. पण त्यांना गडकरी यांना भेटून निवेदन देता आले नाही. मात्र, त्यानंतर त्यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर विषय मांडल्यानंतर मला निवेदन द्या मी पोहचविण्याची व्यवस्था करतो असे नागरिकांना सांगितले.

मुंबईत ते सातारा या महामार्गाचे रुंदीकरण करताना मुख्यरस्त्यासह सर्व्हिस रस्ता केला जात आहे. आमच्या सोसायटीच्या सीमा भिंतीला लागून सर्व्हिस रस्ता आला आहे. महामार्ग तर अवघ्या ४० मीटर लांब आहे. यामुळे वाहनांचा आवाज, धूर यामुळे मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे. आम्ही अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाने साउंड बॅरियर लावलेले नाहीत. यासंदर्भात नितीन गडकरी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे स्थानिक रहिवासी सागर म्हसूरकर यांनी सांगितले. यावेळी मनीष देव, युवेश नाईक, जय शहा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT