mahastudent app
mahastudent app  sakal
पुणे

पुणे : ‘महास्टुडंट ॲप’द्वारे आता हजेरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळा म्हटलं की शिक्षकांकडून ‘कॅटलॉग’वर दररोज विद्यार्थ्यांची हजेरी किंवा अनुपस्थिती नोंदविणे हे आलेच. परंतु आता ही ‘कॅटलॉग’वरील हजेरी लवकरच कालबाह्य होण्याची चिन्हे आहेत. कारण, आता ‘महास्टुडंट’ ॲपच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही हजेरी एका क्लिकवर डिजिटल स्वरूपात नोंदविली जाणार आहे. होय, आता लवकरच शाळा-शाळांमध्ये हजेरी नोंदविण्यासाठी ‘महास्टुडंट’ ॲप वापरले जाणार आहे.

तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात येते. परंतु आता केंद्र सरकारने ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ हा निर्देशांक विकसित केला आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांची डिजिटल पद्धतीने उपस्थितीसाठी गुण असणार आहेत. म्हणूनच आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सरल प्रणालीवर आधारित विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी ‘महास्टुडंट’ ॲपला मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने ‘महास्टुंडट’ हे ॲप विकसित केले असून ते गुगल प्ले स्टोअरवर याच नावाने उपलब्ध आहे. यामध्ये राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

याआधारे शिक्षकाला आपल्या वर्गातील अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी आणि गैरहजेरी एका क्लिकसरशी नोंदविता येणार आहे. यासोबत शाळेमधील सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक (कॅटलॉग) वेगळ्याने ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी आवश्यक असणारे दोन्ही ॲपचे एकत्रीकरण करण्यात येईल. त्यामुळे राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर एका क्लिकवर विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती कळण्यास मदत होईल, असे शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

महास्टुडंट ॲपच्या मदतीने विद्यार्थी आणि शिक्षकांची दैनंदिन हजेरी डिजिटल स्वरूपात नोंदविणे शक्य होणार आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीची माहिती संकलित होऊन ती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल. त्याचप्रमाणे दैनंदिन उपस्थिती, माध्यान्ह भोजन योजना, अंतर्गत मूल्यमापनाची नोंद ठेवण्यासाठी प्रत्यक्षात होणारे ‘पेपर वर्क’ कमी होणार आहे.

- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ते, मुख्याध्यापक महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT