Corona_beds 
पुणे

पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग; खासगी रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुरेसे बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गतवर्षी कोरोनाची गंभीर स्थिती असताना १३ ऑक्टोबर रोजी खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध झालेल्या बेड्सची संख्या दोन हजार १३४ होती. येत्या सहा एप्रिलपर्यंत तेवढे बेड्स खासगी रुग्णालयांकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी (ता.१) खासगी रुग्णालयांच्या पदाधिकारी आणि डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. गुरुवारच्या बैठकीत खासगी रुग्णालयांनी २७५ बेड्स देण्याचे मान्य केले. येत्या तीन आणि सहा एप्रिल रोजी आणखी पाचशे बेड्स उपलब्ध होणार आहेत. 

ससून रुग्णालयातही आज ३० बेड्स वाढविण्यात आले आहेत. ससूनमध्ये शुक्रवारी आणखी शंभर बेड्स वाढविण्यात येणार आहेत. तसेच, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सहाशे बेड्सचे स्वतंत्र कोविड रुग्णालय उपलब्ध होणार असल्याचे राव यांनी सांगितले. 

खासगी रुग्णालयही चालविण्याची तयारी 
ज्या खासगी रुग्णालयांना बेड्स देण्यासाठी अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, अशी खासगी रुग्णालये प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील. सध्या प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे, असे विभागीय आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. 

खासगी रुग्णालयातील बेड॒सची संख्या (एक एप्रिल २०२१ पर्यंत) 
एकूण बेड्स - १ हजार ४२३ 
ऑक्सिजनविरहीत बेड्स - २५५ 
ऑक्सिजन बेड्स - ९७२ 
आयसीयू बेड्स - ६७ 
आयसीयू बेड्स व्हेंटिलेटरसह - १२९ 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT