Pune Sakal
पुणे

Pune: वाहनांच्या संख्येत चार वर्षांत आठ लाखांनी वाढ झाली; मात्र तरी ताशी वेग १८ किमीच, अहवालात काय सांगितले ?

पर्यावरण अहवालात अद्ययावत माहितीच नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षी अडीच लाखांनी, तर चार वर्षांत आठ लाखांनी वाढ झाली; मात्र एका तासाच्या प्रवासासाठी साधारण किती वेळ लागतो, याची अद्ययावत माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडेच नाही.

२०१८ मध्ये सर्वंकष वाहतूक आराखड्यात गर्दीच्या वेळेतील सरासरी वेग १८ किलोमीटर होता. हीच माहिती २०२३च्या पर्यावरण अहवालात समाविष्ट केली आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २०२२-२३ चा पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल मुख्य सभेला सादर केला. अहवालात वाहनांची वाढती संख्या, त्यामुळे वाढणारे प्रदूषण, महापालिकेकडून सुरू असलेले प्रयत्न याचा ऊहापोह केला आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे विस्तारीकरण, मिसिंग लिंक जोडणे, ‘पीएमपी’चे सक्षमीकरण, रिंगरोड, उड्डाणपूल, भुयारी मार्ग करणे अशा विविध पर्यायांवर चर्चा केली जाते. मात्र, निर्णय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाची गती ही अतिशय संथ असल्याने वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

अपेक्षित वेग ताशी ४० किमी

पुणे ‘आरटीओ’ला एका सामाजिक संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार वाहतुकीचा वेग हा सरासरी ४० किमी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यातील वाहतुकीचा सरासरी वेग ताशी १९ किमी आहे. अपेक्षित वेगाच्या तुलनेत हा वेग खूपच कमी आहे. दिवसेंदिवस हा वेग कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर १९ टक्के

पुण्यात सध्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे. २०१८ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला.

त्यात गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग सरासरी १८ किलोमीटर असल्याचे नमूद केले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर १९ टक्के आणि खासगी दुचाकी व चार चाकीचा वापर तब्बल ८३ टक्के नागरिक करतात असेही म्हटले आहे.

दर पाच वर्षांनी हा आराखडा तयार केला जातो. त्यामुळे ही आकडेवारी २०२३ मध्ये अद्ययावत होणार आहे.

वाहतुकीचा वेग किती?

दरवर्षी पर्यावरणाची सद्यःस्थिती सादर करणे महापालिकेला अनिवार्य आहे. त्यानुसार जुलैमध्ये अहवाल सादर केला जातो. अहवालात वाहतुकीबद्दल भाष्य करताना २०१८ मधील माहिती नमूद केली आहे.

त्यामुळे शहराच्या वाहतुकीचा वेग नेमका किती? त्याची वस्तुस्‍थिती समोर येत नाही. त्याचप्रमाणे शहरात २०१९ ते २०२२ या चार वर्षांत तब्बल आठ लाख १४ हजार २०४ वाहनांची संख्या वाढली आहे. असे असताना गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग प्रतितास १८ किलोमीटर एवढा दाखविला आहे. यावरून महापालिकेने वेग मोजण्याचा प्रयत्नच केलेला दिसत नाही.

टॉमटॉमच्या अहवालात ४० मिनिटे

‘टॉमटॉम’ या संकेतस्थळावर पुण्यात १० किलोमीटरच्या प्रवासासाठी सरासरी २७ मिनिटे २० सेकंद इतका वेळ लागतो. वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सहावा क्रमांक लागतो. ‘टॉमटॉम’च्या अहवालानुसार गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ७.३० वाजता शहरात २०७ ठिकाणी वाहतूक कोंडी होती, तर प्रति १० किलोमीटरसाठी ३९ मिनिटे ४३ सेकंद लागत असल्याचे नमूद केले आहे.

...अशी वाढली वाहनांची संख्या

२०१९ - २,३९,६६०

२०२० - १,४९, २३५

२०२१ - १,६९,५५२

२०२२ - २,५५,७५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT