पुणे, ता. ११ : कर्करोगाच्या प्रगत व गुंतागुंतीच्या अवस्थेतील अत्याधुनिक उपचारांवर मंथन करण्यासाठी ‘ऑन्कोलॉजी ग्रुप ऑफ पुणे’तर्फे (ओजीपी) तिसऱ्या आंतरराष्ट्रीय द्वैवार्षिक परिषदेचे आयोजन केले आहे. १८ आणि १९ सप्टेंबरला हयात रीजन्सी हॉटेल येथे परिषद होणार असून, यात देश-विदेशातील आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘ओजीपी’चे अध्यक्ष डॉ. देबांशू भादुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. राकेश नेवे, डॉ. नागेश शिरसाट, डॉ. स्निता सिनुकुमार आणि डॉ. तुषार पाटील आदी उपस्थित होते. भादुरी म्हणाले, ‘‘परिषदेत प्रामुख्याने ‘पोटातील पडद्याचा कर्करोग’ (पेरिटोनियल सरफेस ऑन्कोलॉजी) आणि स्त्रीरोगविषयक कर्करोगशास्त्र यावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे. अत्याधुनिक सायटोरिडक्टिव्ह शस्त्रक्रिया (सीआरएस) आणि हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी (एचआयपीईसी) तंत्रज्ञानामुळे चौथ्या टप्प्यातील (स्टेज ४) कर्करोगावरही नियंत्रण मिळवणे व काही अंशी तो बरा करणे शक्य आहे.’’
या परिषदेत अमेरिकेचे प्रा. पॉल शुगरबाकर, फ्रान्सचे प्रा. ऑलिव्हियर ग्लेहेन, अर्मेनियाचे प्रा. आर्टेम स्टेपनॅन आणि स्पेनच्या प्रा. लाना बिजेलिक हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कर्करोग उपचारातील बहुशाखीय आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोनावर यात भर दिला जाणार आहे. दरम्यान, मुख्य परिषदेपूर्वी १७ सप्टेंबरला सिम्बायोसिस स्किल्स लॅबमध्ये डॉक्टरांसाठी विशेष परिषदपूर्व वैद्यकीय कार्यशाळा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.