Pune : दीड बर्षाचा मुलगा बेपत्ता; बिबट्याने नेल्याचा नागरिकांना संशय sakal
पुणे

Pune : दीड बर्षाचा मुलगा बेपत्ता; बिबट्याने नेल्याचा नागरिकांना संशय

नागरिक व वनविभागाने परिसर पिंजून काढला परंतु मुलाचा काही शोध लागला नाही

नवनाथ भेके - सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव (पुणे) : दीड वर्षाचा मुलगा कृष्णा विलास गाढवे सकाळी साडे नऊ वाजता घराच्या ओट्यावर खेळता खेळता अचानक बेपत्ता झाला परिसरात बिबट्याचा वावर तसेच उसाचे क्षेत्र असल्याने मुलाला बिबट्याने उचलून नेल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला नागरिक व वनविभागाने परिसर पिंजून काढला परंतु मुलाचा काही शोध लागला नाही ही घटना आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गाढवे मळ्यात सोमवारी घडली शिंगवे( ता. आंबेगाव ) येथे गाढवे वस्तीत दीड वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना सोमवार ता आठ सकाळी साडेनऊ वाजता घडली .मुलाला बिबट्याने पळवले असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे . कृष्णा विलास गाढवे असे मुलाचे नाव आहे .

शिंगवे गावात गाढवे वस्तीत सोमवारी सकाळी कृष्णा विलास गाढवे हा दीड वर्षांचा मुलगा घराच्या ओट्यावर खेळत होता . साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो अचानक बेपत्ता झाला,घरच्यांनी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही मिळाला नाही त्यानंतर स्थानिकांनी घराच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला परंतु कृष्णा सापडला नाही त्यानंतर कृष्णाला बिबट्यानेच पळवून नेल्याचा संशय बळावला येथील परिसरात बिबट्यांचा वावर अनेक दिवसांपासून असून उसाचे क्षेत्र अधिक आहे .

शेतकऱ्यांना अनेक वेळा एका वेळेस दोन दोन...तीन तीन बिबटे दृष्टीस पडले आहे त्यामुळे मुलाला बिबट्याने पळवले असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे . पोलीस पाटील गणेश पंडित, उपसरपंच संतोष वाव्हळ,नितीन वाव्हळ, प्रकाश गाढवे यांनी वन विभाग व मंचर पोलिस ठाण्याला घटनेची खबर दिली .वनपाल विजय वेलकर, एन .एम.आरूडे, वनरक्षक पूजा पवार, डि .एस. शिवशरण, संपत भोर, शरद जाधव, यांनी उसाच्या शेतामध्ये पहाणी केली .परंतु बेपत्ता कृष्णाचा शोध लागला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT