marathi news nasik onion production  esakal
पुणे

Pune Onion News: "इकडं भाव नाही, परदेशात कांदा विकून देतो"; व्यावसायिकाची ४६ लाखांची फसवणूक

अनेक वेळा माल घेऊन केला पोबारा

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आपल्याकडं कांद्याला सध्या भाव नाही तर परदेशात कांदा विकून मोठा नफा मिळवून देतो असं आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Onion News Fraud of merchant of Rs 46 lakhs to the bait of selling onion to foreign)

पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रजमधील व्यावसायीक स्वप्नील बेल्हेकर यांची फसवणूक झाली आहे. कांदा परदेशात विकून नफा करून देतो असे अमिष दाखवत त्यांना ४६ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धाप्पा भंडारी, गजेंद्र सिद्धाप्पा या कर्नाटकच्या रहिवाशांना राहणारे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सगळा प्रकार सन 2021 पासून आत्तापर्यंत सुरू होता. व्यावसायानिमित्त बेल्हेकर यांची सिद्धाप्पा भंडारी आणि गजेंद्र सिद्धाप्पा यांच्याशी ओळख झाली होती. आम्ही कांद्याचे मोठे व्यापारी आहोत आणि तुमचा माल परदेशात विकून मोठा नफा करून देतो असं या दोघांनी बेल्हेकर यांना सांगत त्यांचा विश्वासही संपादन केला. व्यवसायाच्या नावाखाली त्यांनी अनेक वेळा बेल्हेकर यांच्याकडून कांद्याचा माल घेतला पण त्याचे पैसे कधीच दिले नाहीत. दोघांनी मिळून बेल्हेकर यांच्याकडून तबबल ४६ लाख रुपयांचा माल घेतला, पण पैसे दिले नाहीत.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बेल्हेकर यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT