pune news sakal
पुणे

Pune: दुष्काळग्रस्तांना शुल्क माफीसाठी जाचक अटी, महाविद्यालयांकडून कागदपत्रांचा तगादा

कोणत्याही शिष्यवृत्तीचा आणि सवलतीचा लाभ घेतलेला नसावा, उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे, विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असावा, उशिरा आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही, अशा शब्दांमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचे फर्मान महाविद्यालयांनी धाडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: कोणत्याही शिष्यवृत्तीचा आणि सवलतीचा लाभ घेतलेला नसावा, उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे, विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचा दाखला असावा, उशिरा आलेल्या अर्जांचा विचार होणार नाही, त्याची जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच राहील... अशा शब्दांमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचे फर्मान महाविद्यालयांनी धाडले आहे.

एकंदरीत काय शासनाकडून दुष्काळग्रस्तांना सरसकट परीक्षा शुल्कमाफीचे गाजर दाखविण्यात आले आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

परीक्षांच्या ऐन मोक्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना शुल्कमाफी संदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. ज्याच्या आधारे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अशा जाचक अटींच्या आधारे परीक्षा शुल्क परताव्याचे फर्मान सोडले आहे.

अवघ्या चार ते पात दिवसांची मुदत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून ही माहिती मागवली आहे. एकंदरीत प्रक्रिया पाहता अनेक गरजू विद्यार्थी वंचित राहणार असल्याची शक्यताच जास्त आहे.

शासनाकडून शुल्कमाफीचे परीपत्रक काढण्यात आले. मात्र विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरच्या अटींतील संभ्रम आणि आडमूठ्या भूमिकांमुळे विद्यार्थ्यांला लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

महाविद्यालयांच्या जाचक अटी :

पुण्यातील अनेक नामवंत महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कमाफीसाठी विद्यार्थ्यांना काही जाचक अटी लादल्या आहे. ज्या आधारे विद्यार्थ्यांना सवलतीच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. त्या अटी पुढीलप्रमाणे...

  • शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार नाही

  • जे विद्यार्थी त्याच परीक्षेत दुसऱ्यांदा बसले आहेत

  • ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात राहतात, नोकरी व उद्योगधंदा करतात, पण त्यांच्या नावे गावी शेती आहे. असे पाल्य सवलतीस पात्र नाही

शिष्यवृत्तीचे हमीपत्र वगळले :

स्टुडंट हेल्पींग हॅंडच्या वतीने विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाला इ-मेलद्वारे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे म्हणतात, ‘‘इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेत नसल्याबाबत विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात येणारे हमीपत्र प्रक्रियेतून रद्द करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची खातरजमा करण्यासाठी कागदपत्रे तपासून घेण्यात येत आहे.’’ असे असतानाही अनेक महाविद्यालये स्वतःच्या मर्जीने अनेक अटी विद्यार्थ्यांवर लादले असल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यापीठ व शासनाच्या दुष्काळग्रस्त परीक्षा शुल्क माफी संदर्भातील निर्णयांनी विद्यार्थी संभ्रमात आहेत. जाचक अटी व नियमांमुळे विद्यार्थी परीक्षा शुल्क माफी पासून वंचित राहत असून, सरसकट शुल्कमाफी करावी. परतावा मिळेल असे न सांगता परीक्षा शुल्क भरण्यास लावू नये. ही मागणी आहे.

- ॲड. कुलदीप आंबेकर, संस्थापक स्टुडंट हेल्पींग हँडस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Crime News : हिमाचलमध्ये हत्या करून फरार .चौघे बिहारी अटकेत; जळगावात मोबाईल विकायला उतरताच पडल्या बेड्या

SCROLL FOR NEXT