pune sakal
पुणे

Pune: जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन; जगभरातून २५४ व्यंगचित्रकारांचा सहभाग

पुणे येथे जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त बालगंधर्व कलादालन येथे व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

किशोर गरड

पुणे - जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे  करण्यात आले आहे.सदरील महोत्सवाचे उद्घाटन  व्यंगचित्रकार तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ५ मे ला होणार असल्याची माहिती युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड यांनी दिली.

महोत्सवात जगभरातील २५४ तर भारतातील शंभर  व्यंगचित्रकारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला असून,विविध रंग व रेषांचे आविष्कार चोखंदळ पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.महोत्सवाचे उदघाटन५ मे ला सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

हा महोत्सव तीन दिवस चालणार असून तीन दिवस विवध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवा दरम्यान, परिसंवाद, व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके तसेच नवोदित व दिग्गज व्यंगचित्रकारांचा कलाविष्कार आणि मार्गदर्शन मिळणार येणार आहे. 

परिसंवादामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार व कवी रामदास फुटाणे सहभागी होणार आहेत.तसेच रविवार दिनांक ७ मे रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते व्यंगचित्रकार बांधवांना सन्मानित करण्यात येणार आहे.

अशी माहिती महोत्सवाचे आयोजक धनराज गरड यांनी दिली.यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित,विश्वास सूर्यवंशी,योगेंद्र भगत,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया - व्यंगचित्र कला ही अत्यंत दुर्मिळ आणि मार्मिक कला आहे.समाजातील अनेक घडामोडींवर आपल्या व्यंगचित्र कलेतून व्यंगात्मक टिपणी करून समाज जागृतीचे काम व्यंगचित्रकार करतात.

व्यंगचित्रकार दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्था आयोजित व कार्टूनिस्ट्स् कंम्बाईन संस्था यांच्या सहकार्याने पुण्यात प्रथमच 'पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

- धनराज गरड,अध्यक्ष युवा संवाद सामाजिक संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT