Tree Collapse sakal
पुणे

Tree Collapse : पुणे-पानशेत रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुक ठप्प; स्थानिक व पर्यटक अडकले

पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत पाऊस व वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

निलेश बोरुडे

सिंहगड - पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर (ता. हवेली) गावच्या हद्दीत पाऊस व वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे जवान झाड हटविण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाऊस व वाऱ्यामुळे मोठे झाड रस्त्यावर आडवे पडले आहे. ज्या ठिकाणी झाड पडले तेथे एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला खडकवासला धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी रस्ता नसल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांची वाहने दोन्ही बाजूंना अडकून पडली आहे.

याबाबत माहिती मिळताच पीएमआरडीचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेश घटमाळ, शुभम मिरगुंडे, विशाल घोडे, भाऊसाहेब आव्हाड व अतुल रोकडे हे जवान झाड हटविण्यासाठी रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

Aambegaon Heavy Rain: आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस; मंचरमध्ये ५१ मिमी पावसाची नोंद, शेतकऱ्यांना दिलासा तर वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT