पुणे

पुणे युरो स्कूल धक्काबुक्की प्रकरण: शाळेची मान्यता रद्द होणार?

शाळेतील लेडी बाउंसरने पालकांना केली होती धक्काबुक्की

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील उंड्री येथील युरो स्कुलवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचा आदेश शिक्षण विभागाने दिलाय. ४ एप्रिल रोजी पालकांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी हा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलाय. युरो स्कुलमधील लेडी बांउसरने शाळेत आलेल्या पालकांना धक्काबुक्की केली होती. मंगळवारी राज्य शिक्षण विभागाकडून युरो स्कुलच्या संचालक मंडळ आणि संबंधितांची दिवसभर पुर्ण चौकशी केल्यानंतर, या शाळेविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचे आदेश देखील शिक्षण विभागाने दिलेत. (Education depatment have asked to launch police complaint against Euro school)

या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत देखील अहवाल सादर केला जाणार आहे. एखाद्या शाळेविरोधात पहिल्यांदाच इतकी कडक कारवाई करण्यात आलेली आहे. यातून मुजोरी करणाऱ्या शाळांना लगाम लागेल हे नक्की

उंड्री येथील युरो शाळेत शालेय शुल्कावरुन वाद झाला होता. शाळेने अनेक विद्यार्थ्यांना ई मेलवर टिसी पाठविण्यात आले होते. त्यानंतर पालक शाळेत गेले असता तेथील बाउंसरने पालकांना धक्काबुक्की केली होती. शाळेत बाउंसर नियुक्त करु नयेत असे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते मात्र हा आदेश शाळेने धुडकावला.

RTE कायद्यानुसार १२,ख अन्वये शाळांची मान्यता रद्द करण्याविषयीचा अधिकार आहेत. शिक्षण उपसंचालक औंदुंबर उकिरडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शाळेविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत. "शाळेतुन काढलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश दिले जातील असं शाळेनं म्हंटलं असलं तरी अद्याप लेखी स्वरुपात मात्र अजुनही कम्युनिकेशन झालं नसल्याचं पालक संघटनेच्या अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी सकाळ ऑनलाईलशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT