st buses
st buses sakal
पुणे

Pune : एसटी बंद असल्याने प्रवाशांची खासगी वाहनांना पसंती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘वाट पाहीन पण एसटीने जाईन’’ अशी जाहीरात करून प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी संध्या संपावर असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे एसटीची वाट पाहत बसलो तर उशीर होर्इल त्या पेक्षा खासगी वाहनाने प्रवास केलेला बरा, असे म्हणत प्रवाशांनी आता दुचाकी, कार किंवा ट्रव्हॅल्सकडे मोर्चा वळवला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना किमान व सुविधा मिळण्यासह विविध मागण्यासाठी ऐन दिवाळीत एसटी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. कामगारांच्या मागण्या विचारात घेत त्यावर तोडगा काढण्याबाबत झालेल्या बैठका यशस्वी न झाल्याने प्रवाशांचे हाल अद्याप सुरू आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आता प्रवाशी दुचाकी, कार किंवा ट्रव्हॅल्सने प्रवास करीत आहेत. स्वतःचे वाहन नसल्याने भाडेतत्त्वावर वाहन घेत इच्छीत स्थळ गाठले आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या वाहनांचे दर देखील कडाडले असून वाहनांची कमतरता देखील जाणवत आहे.

त्यात राज्य सरकारने खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. वाहतुकीची रिसतर परवानगीच मिळाल्याने या वाहतुकदारांनी देखील त्या पद्धतीचे नियोजन सुरू केले आहे.

याबाबत बस अँड कार ऑपरेटर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन यांनी सांगितले की, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून दुरावलेल्या प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्याची खासगी वाहतुकदारांना ही चांगली संधी आहे. त्यामुळे प्रवाशांना सेवा पुरविताना त्यांची आर्थिक लुट करू नये. तसेच त्यांना चांगली सेवा देणे ही आमची जबाबदारी आहे. त्याबाबतची विनंती देखील संघटनेच्या माध्यमातून वाहतुकदारांना करण्यात आली आहे. कालपासून बस आणि कारला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

"सोमवार आणि मंगळवार या गेल्या दोन दिवसात मी पुणे ते कराड अशा तीन ट्रीप केल्या आहेत. इतरवेळी आठवड्यातून तीन वेळा अशा ट्रीप होतात. एसटी बंद असल्याने खासगी कारला असलेली मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्यावर खासगी वाहने देखील जास्त आहेत."

- किशोर शिंदे, खासगी प्रवासी वाहतूक करणारा व्यवसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT