पुणे

‘पाताल लोक’ आता रिंगरोडला जोडणार

CD

पुणे, ता. ११ : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील अतिमहत्त्वाकांक्षी ‘पाताल लोक’ या भूमिगत मार्गात बदल करत, आता हा भुयारी मार्ग थेट ‘एचसीएमटीआर’ आणि ‘इनर रिंगरोड’ला जमिनीखालून जोडला जाणार आहे. त्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

‘पीएमआरडीए’ने कात्रज ते येरवडा असा बोगद्याचा प्रस्ताव सादर करावा, तसेच या प्रकल्पाचा आराखडा तयार करावा, हा ‘ट्विन टनेल’ असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. तसेच, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत एका कार्यक्रमात त्यांनी पुण्यात ‘पाताल लोक’ करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ने निविदा मागवून सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीने सर्व्हेक्षण पूर्ण करून यापूर्वीच प्रारूप आराखडा प्राधिकरणाला सादर केला होता.
मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए आणि पुणे महापालिका यांची एकत्रित बैठक झाली. त्यात हा प्रारूप आराखडा सादर केला होता. त्यावेळी ‘एचसीएमटीआर’ आणि ‘इनर रिंगरोड’साठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली. त्याद्वारे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांना जमिनीखालून जोडेल, अशा पद्धतीने ‘पाताल लोक’ची रचना करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे प्रारूप आराखड्यात बदल करण्याच्या सूचना दिल्याचे डुडी यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेने १९८७ च्या विकास आराखड्यात दोन बोगद्यांच्या कामांच्या सल्लागार नेमण्यासाठीच्या निविदा काढल्या आहेत. हे दोन्ही बोगदे ‘पाताल लोक’ योजनेच्या प्रारूप आराखड्यात दर्शविण्यात आले होते. परंतु, आता ते स्वतंत्रपणे त्यांचे काम हाती घेण्यात आले आहेत.

भूसंपादनात मोठी बचत
‘एचसीएमटीआर’ आणि ‘इनर रिंगरोड’ला जमिनीखालून ‘पाताल लोक’चा मार्ग जोडण्याचा निर्णय घेतल्यास अतिशय कमी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच, या योजनेसाठी येणाऱ्या खर्चातही काही प्रमाणात बचत होणार आहे. तसेच, शहरात एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात..
- प्रस्तावित प्रकल्प : सुमारे ५४ किमी लांबीचा दुमजली वर्तुळाकार भूमिगत रस्ता.
- कनेक्टिव्हिटी : सहा ते सात ठिकाणावरून ये-जा करणे शक्य.
- अपेक्षित खर्च : सुमारे ३५ हजार कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT