pune road condition sakal
पुणे

पुण्यात खड्ड्यांमुळे ३० ते ४० टक्क्यांनी रुग्ण वाढले

असंख्य नागरिक रोजच्या रोज अक्षरशः जीव मुठीत धरून पुणे शहरातील रस्त्यांवर प्रवास करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

असंख्य नागरिक रोजच्या रोज अक्षरशः जीव मुठीत धरून पुणे शहरातील रस्त्यांवर प्रवास करत आहेत.

पुणे - उंड्री-पिसोळी रस्त्यावरून पत्नीसह दुचाकीवरून प्रवास करत असतानाच मागून जड वाहने येत होती. त्यामुळे दुचाकी वळविता येत नव्हती आणि रस्त्यात थांबताही येत नव्हते. त्यामुळे समोर पाण्याने भरलेल्या डबक्यात दुचाकी घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही. पण, तो पाण्याने भरलेला मोठा खड्डा होता. त्यात गाडी अडकली आणि पडलो. माझ्या पायाला मार लागला. पत्नी मात्र थोडक्यात बचावली...

कोळपे यांच्याप्रमाणे असंख्य नागरिक रोजच्या रोज या आणि अशा प्रकारे अक्षरशः जीव मुठीत धरून शहरातील रस्त्यांवर प्रवास करत आहेत. रस्त्यांनी निकृष्ट कामे आणि अयोग्य पद्धतीने बुजवलेले खड्डे यामुळे पुणेकरांवर ही वेळ आली आहे. कात्रज-कोंढवा रस्ता हे याचं उत्तम उदाहरण आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी केलेला डांबरी रस्ता १०-१५ दिवसांच्या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

जबाबदारी कोण घेणार?

रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. कोणता चुकवायचा आणि कोणत्या खड्ड्यातून गाडी घालायची, हा अगदी आयत्या वेळी निर्णय घ्यावा लागतो. त्यात तोल गेल्यानंतर काही ना काही दुखापत झाली म्हणूनच समजायची. एक-दोन पावसांमध्ये रस्त्यांना खोल खड्डे पडतात. त्यामुळे दुचाकी चालक पडतात. दुखापतीमुळे येणारे अपंगत्व, उपचारांसाठी होणारा खर्च याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल दुचाकी चालक अनिल बोर्डे यांनी केला आहे.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रोज किमान एक तरी रुग्ण खड्ड्यांमुळे पडून जखमी झाल्याचे मी बघत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. दुचाकी खड्ड्यात गेल्याने मागे बसलेल्या ७९ वर्षीय महिला उपचारासाठी रुग्णालयात आल्या होत्या. त्या गाडीवरून उडून छातीवर पडल्या.

- डॉ. नितीन भगली, अस्थिरोगतज्ज्ञ

दुचाकी घसरून पडल्याचे बरेच रुग्ण सध्या रुग्णालयात उपचारांसाठी येत आहेत. त्यात मनगट आणि पायाचे फॅक्चर्स वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत रूग्ण वाढले आहेत.

- डॉ. नीरज आडकर, संचालक, अस्थिरोग विभाग, रूबी हॉल क्लिनिक

डॉक्टरांचा निष्कर्ष

शहरातील रस्त्या-रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुणेकरांची हाडन् हाड खिळखिळी झाली आहेत. त्याला कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक तर अपवाद नाहीतच, पण विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही पाठीची दुखणी वाढण्यामागे रस्त्यातील खड्डे हे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष शहरातील अस्थिरोग तज्ज्ञांनी काढला आहे. सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, कोंढवा, उंड्री, पिसोळी या भागात मुख्य रस्त्यांना भीषण खड्डे पडले आहेत. तीच अवस्था नगर रस्त्यांसह इतर उपनगरांमध्ये दिसते. पुण्यातील खड्डे बुजविल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असले तरीही प्रत्यक्षात रस्त्या-रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आपटून पुणेकरांची हाडे खिळखिळी झाल्याच्या तक्रारी घेऊन अस्थिरोग तज्ज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

अस्थिबंधाच्या दुखापती वाढल्या

गेल्या दोन महिन्यांपूर्वी दुचाकीवरून पडणे, गाडी घसरल्याने दुखापत होणे, खड्ड्यातून गाडी गेल्याने मणका दुखणे, फ्रॅक्चर अशा रुग्णांची संख्या अत्यल्प होती. आता या तक्रारी घेऊन रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण शहरातील वेगवेगळ्या अस्थिरोग तज्ज्ञांनी नोंदविले.

याबाबत अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. निखिल लिखते म्हणाले, 'खड्ड्यांमुळे खांदे आणि गुडघ्याच्या दुखापती वाढल्या आहेत. अचानक पाय वळला जातो, त्यामुळे अस्थिबंधाच्या दुखापती वाढल्या आहेत. यात तरुण रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच, पाठीच्या दुखण्याचेही प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यात मणक्याला मार बसणे, मणक्याच्या चकत्या सरकणे अशांचा यात समावेश होतो.'

पालथ्या घड्यावर पाणी...

फुटक्या मडक्यात जर आधण ठेवलं तर त्यात स्वयंपाक करता येईल असे कधी होणार नाही. खापरावर परिस घासून त्याचा कीस काढला तरी त्यात काही बदल होणार नाही. पालथ्या घागरीवर कितीही हंडे भरून पाणी रिचवा, ती घागर कधी भरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ‘दुष्ट लोकांनी हरीकथा ऐकली तरीही त्यांच्यात काहीही बदल होणार नाही.’ असंच काही सरकारी अधिकाऱ्यांबात म्हणावसं वाटतं. त्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध कितीही आवाज उठवा पालथ्या घड्यावर पाण्यासारखंच आहे. रस्त्यांची निकृष्ट कामे, अयोग्य पद्धतीने बुजवलेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांवर भयानक वेळ आली आहे. महिनाभरापूर्वी केलेला डांबरी रस्ता १०-१५ दिवसांच्या पावसात वाहून गेला आहे. अपघात वाढले आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रिया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT