Remdesivir
Remdesivir  
पुणे

रेमडेसिव्हीर आणायचे कोठून? वडिलांसाठी रेमडेसिव्हीरच्या शोधात तरुणीची पायपीट

सकाळ डिजिटल टीम

पुणे : वडिलांवर खासगी कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्या रुग्णालयात रेमडेसिव्हीर नाही. चार दिवस झाले. खासगी रुग्णालयातील डॉक्टर म्हणतात, बाहेरून शोधून आणा रूबी, पूना हॉस्पिटलसारख्या रुग्णालयांच्या मेडिकल दुकानात गेल्यानंतर ते म्हणतात, आम्ही आमच्या रुग्णालयात दाखल रुग्णांसाठीच देतो. रेमडेसिव्हीर बऱ्याच खासगी रुग्णालयात नाही आणि बाहेरही मिळत नाही. ससून रुग्णालयाच्या मेडिकल दुकानात नंबर लागत नाही. मग रेमडेसिव्हीर आणायचे कोठून? वडिलांचे हाल पाहवत नाहीत. १२०० रुपयांचे इंजक्शन १२ ते २० हजार रुपयांना विक्री केले जात आहे. आमची तेवढी परिस्थिती नाही. रेमडिसिव्हीच्या शोधात असलेली तरुणी ‘सकाळ’शी बोलत होती.

पुणे शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून रेमडेसिव्हीरचा तुटवडा आहे. काळाबाजार रोखण्यासाठी रुग्णालयातच रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देणार तसेच, रुग्णालयात मिळत नसेल तर ती प्रशासनाची जबाबदारी राहील, असे चार दिवसांपूर्वी सांगण्यात आले. जिल्ह्यात दररोज ४० हजार रेमडेसिव्हीरची गरज असताना तीन-चार हजार उपलब्ध होत आहेत. रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाइकांनाही ते मिळत नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नातेवाइकांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेउन सर्व प्रकार सांगितला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण आणि संबंधित रुग्णालयांची नावे लिहून घेत रेमडेसिव्हीरचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. तसेच, जिल्ह्यात त्याचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रुग्णालयांचे डॉक्टरही हताश

काही विशिष्ट रुग्णालयांच्या मेडिकलमध्ये रेमडेसिव्हीर पुरवठा सुरू आहे. वितरकांकडून ते वेळेवर मिळत नाही, असा आरोप एका रुग्णालयाने केला. आमच्या रुग्णालयाने चार-पाच दिवसांपूर्वी कंपनीकडे पैसे भरले. परंतु कंपनीकडूनही पुरवठा होत नाही. त्यासाठी दिवसभर वडकीच्या डेपोला कर्मचाऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. रुग्णालयांना मिळत नाही तर रुग्णांना कसे देणार, अशी खंत एका रुग्णालयातील डॉक्टरने व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT