Pune people adopt 39 animals good response from citizens to adoption scheme Sakal
पुणे

Pune News : पुणेकरांनी घेतले ३९ प्राण्यांचे पालकत्व; दत्तक योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतर प्राणिमित्रांकडून प्राणी दत्तक घेण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनानंतर प्राणिमित्रांकडून प्राणी दत्तक घेण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चालू वर्ष २०२३-२४मध्ये प्राप्त झालेली मदत ही मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट आहे.

कोरोनानंतर २०२०-२१मध्ये १२ प्राण्यांना दत्तक घेण्यात आले होते. यामधून ३२ हजार १९० रुपयांचे उत्पन्न प्राणिसंग्रहालयाला प्राप्त झाले होते. २०२१-२२मध्ये १० प्राण्यांच्या माध्यमांतून ८४ हजार ३०५ तर चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत ३९ प्राण्यांच्या माध्यमांतून दोन लाख ४३ हजार ६१० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

योजनेची गरज का?

  •  लोकांकडून घेण्यात येणाऱ्या रकमेत प्राण्यांचे खाद्य पूर्ण होत नाही

  •  प्राण्यांवरील प्रेम वाढावे आणि जास्तीत जास्त लोकांचा जिव्हाळा प्राण्यांविषयी निर्माण व्हावा

  •  दत्तक योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रियजनांच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा लोकांना आवडत असलेल्या, लहान मुलांच्या आवडीच्या प्राण्यांचे प्रायोजकत्व घेण्यास लोक जास्त अनुकूल असतात

खर्चाचे गणित

  •  दत्तक योजनेसाठी कोल्ह्याला दिवसाला १३५ रुपये

  •  हत्तीला दिवसाला १५०० रुपये

  •  कोरोनाच्या आधी दत्तक योजनेतून मिळणारे उत्पन्न वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत

  •  कोरोनानंतर ते ३२ हजार रुपयांपर्यंत खाली आले अशी आहे

प्राणी दत्तक योजना

  •  एखादी व्यक्ती, संस्था किंवा उद्योग समूह प्राणी संग्रहालयातील कोणत्याही प्राण्याला त्यांच्यावरील प्रेमापोटी दत्तक घेऊ शकते

  •  या माध्यमांतून प्राण्यांचे खाद्य ते प्रायोजित करू शकतात

  •  कोणताही प्राणी किंवा प्राण्यांचा समूह एक दिवसांपासून एक वर्षांपर्यंत आणि एक वर्षांपासून पाच वर्षांपर्यंत दत्तक घेता येतो

  •  दत्तक योजनेतून मिळालेल्या रकमेचा वापर प्राण्यांसाठी पोषक अन्नपुरवठा, वैद्यकीय उपचार व योग्य काळजी घेण्यासाठी करण्यात येतो

  •  प्राणी संग्रहालयाच्या नियमांच्या अधीन राहून हे सर्व करण्यात येते

  •  प्रायोजकाकडून प्राणी दत्तक योजनेचा निधी केवळ चेक किंवा ड्राफ्टच्या साहाय्याने देण्याची सोय

दत्तक योजनेतून उत्पन्न मिळविणे हा प्राथमिक उद्देश नाही. वन्यजीव संवर्धनामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश व्हावा, त्यांचे प्राण्यांविषयीचे प्रेम वाढावे हा या योजनेमागील उद्देश आहे. अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी होत लोकसहभाग वाढवावा अशी आमची अपेक्षा आहे.

- राजकुमार जाधव, संचालक, कात्रज प्राणी संग्रहालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT