Pune People Eat 40 tonnes of fish, 600 tonnes of chicken for celebration of 31st 
पुणे

अबब! थर्टी फर्स्टला पुणेकरांनी केले 40 टन मासळी अन् 600 टन चिकन फस्त 

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : पुणेकरांनी तब्बल तीन हजार बोकड, 40 टन मासळी, 600 टन चिकन फस्त करून नववर्षाचा आनंद साजरा केला. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मंगळवार आल्याने विविध प्रकारच्या मांसाहारी जेवणावर खवय्यांनी ताव मारला. 

मटण व चिकनला मागणी वाढली असली, तरी त्यांचे दर स्थिर होते. मात्र, मासळीच्या भावात प्रतिकिलो 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली. गणेश पेठेतील मासळी बाजार, मटण बाजार, चिकन-मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी झाली होती. काही भागांत चिकन, मटणाच्या दुकानांजवळ ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 31 डिसेंबरला नॉनव्हेजला अधिक मागणी असल्याची माहिती मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, ठाकूर परदेशी आणि रूपेश परदेशी यांनी दिली. 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारात चिकनला 150, जिवंत कोंबडी 120, लेगपीस 180, बोनलेसला 250 रुपये दर मिळाला. मटणाला किरकोळ बाजारात 580 ते 600 रुपये दर होता. तसेच, पापलेट आणि कोळंबीच्या दरात वाढ झाली. पापलेटमध्ये कापरी 1500, मोठी 900, मध्यम 900, लहान 700-750, भिला 700-750 तर कोळंबी लहान 360, मोठी 550, किंग प्रॉन्स 900, जम्बोला 1500 रुपये दर मिळाला. 

कोरेगाव भीमा : विजयस्तंभास अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
 

हॉटेल, खाणावळी फुल्ल 
नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण सहकुटुंब घराबाहेर पडले होते. त्यामुळे मांसाहारी जेवणाची हॉटेल आणि खाणावळीत गर्दी झाली होती. अनेक कार्यालयांतील सहकारी, संस्था, विविध मंडळे, सोसायट्यांनी एकत्र येऊन मांसाहारीसह शाकाहारी जेवणाचा बेत आखल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamuna Expressway Accident: मध्यरात्री धुक्यात अचानक आगीचा भडका… क्षणात पेटल्या ८ बस-कार; प्रवासी जीवंत जळाले... रात्रीचा थरारक क्षण

Solapur Crime:'विद्यार्थिनींवर अत्याचार करणारा शिक्षक बडतर्फ'; वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा, जन्मठेपेची शिक्षा अन्..

राज्य सरकारचा माेठा निर्णय! 'गुन्हा लपविल्यास मुख्याध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्धही गुन्हा'; जबाबदारी केली निश्‍चित..

मोठी बातमी! कमी पटाच्या झेडपी शाळांवर कंत्राटी शिक्षक; ७० वर्षांपर्यंतच्या सेवानिवृत्त शिक्षकांची २० हजार रुपयांच्या मानधनावर होईल नेमणूक

Pune News : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून पुण्याला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचा उपक्रम; शहराच्या सर्वांगीण विकासावर फडणवीसांचा जोर!

SCROLL FOR NEXT