Gold Google
पुणे

ऑनलाइन सोने खरेदीतून पुणेकरांनी साधला अक्षयतृतीयेचा मुहूर्त

कोरोना काळात ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीवर भर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : निर्बंधामुळे शहरातील सोन्याची दुकाने बंद असली तरी शुक्रवारी अनेकांनी ऑनलाइन सोने खरेदी करीत अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधला.अक्षयतृतीयेला सोने खरेदीसाठी शहरातील सराफ दुकानांत मोठी गर्दी होत असते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे दुकाने बंद असल्याने सोने खरेदी करण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांना दुकान बंद असल्याने प्रत्यक्ष खरेदी करता येत नाही. त्यामुळे ऑनलाइन खरेदीवर भर दिला जात आहे.

शुक्रवारी सोने खरेदीस मिळालेल्या प्रतिसादाबाबत पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात खरेदी झाली नाही. मात्र ऑनलाइन खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. पण सर्वांकडे ऑनलाइनची यंत्रणा नाही.

''पुण्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आता ठराविक वेळीपुरती दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. व्यवसाय बंद असल्याने अनेकांना दुकानाचे भाडे आणि कामगारांना पगार देणे मुश्‍कील झाले आहे. पगार मिळाला नाही तर कामगारांची उपासमार होर्इल. या सर्वांचा विचार सरकारने करावा.''

-फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे व्यापारी संघ

''यंदा ऑनलाइन बुकींगला प्रतिसाद चांगला मिळाला. दुकाने सुरू झाल्यावर बुकिंग केलेल्या भावात ग्राहकांना त्यांचे मनपसंत दागिने खरेदीची संधी आहे. येथून पुढेसुद्धा कमी किमतीची ज्वेलरी ऑनलाइन विकली जाऊ शकेल. मात्र, जास्त किमतीची ज्वेलरी ही दुकानात येऊन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असेल.''

-अजित गाडगीळ, संचालक, पीएनजी सन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT