pune petroleum minister dharmendra pradhan statement about vande mataram 
पुणे

'भारत माता की जय' म्हणावेच लागेल; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशापुढे नागरिका नोंदणीला विरोध केला जात असताना क्रांतीकारक उद्धम सिंग, भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान वाया जाणार का? आपल्याला देश धर्मशाळा बनविणार का? देशात भारत माता की जय म्हणणारेच राहू शकतील, असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ५४ वे प्रदेश अधिवेशन उद्घाटन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. महानगर मंत्री अनिल ठोंबरे, एमजीएमएनएलचे अध्यक्ष  स्वागत समिती सचिव राजेश पांडे, महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहण अरुनिमा  सिन्हा, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रशांत साठे, महानगर अध्यक्ष डॉ. शरद गोस्वामी,  प्रा. सारंग जोशी, प्रमोद चौधरी या वेळी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले प्रधान?
प्रधान म्हणाले, 'काही असमजदार लोकांमुळे, राजकारणामुळे देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे. इतर देशात लोकशाही असली तरी, अनेक गोष्टींवर बंधने आहेत. आपल्या देशात बंधने नसल्याने लोकशाही महान आहे. भारतात विचार भिन्नता, वैचारिक मतभेद आहेत. अशा वेळी देशात नागरिकता नोंदणी व्हावी की नाही यावरून वाद सुरू आहे. जगातील सर्व देशात लोकांची नोंदणी आहे.आपल्या देशातील लोकांची माहिती आपल्याकडे असतील पाहिजे. देशात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरू असताना त्यांना रोखण्यासाठी 'अभाविप'वर महत्वाची जबाबदारी आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : आज भारताच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर कपिल सिबल यांनी हा युक्तिवाद मांडला - राऊत

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

Velhe NCP Protest: सुनेत्रा पवारांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वेल्ह्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंतयात्रा, राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

Congress News: काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला! महिला नेत्याचे पक्षाच्या नेतृत्वावर आरोप, काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT