farmer watermelon Loss sakal
पुणे

पुणे : पिंपळवंडी येथे अज्ञातांकडुन कलिंगडाचे नुकसान

पिंपळवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी : भटकळवाडी काचळेमळा (ता.जुन्नर) येथील शेतकरी किशोर दत्तात्रय काकडे यांची दीड एकर कलिंगड फळबाग असुन गुरुवारी मध्यरात्री अंदाजे दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात इसमाने येऊन शेतात पिकलेल्या कलिंगडांवर हत्याराने कापुन इतरत्र फेकुन दिले.

किशोर काकडे यांनी सांगितले की, आम्ही घरातील सर्व सदस्यांनी या रणरणत्या उन्हात जीव ओतुन कलिंगडाचे पीक घेतले, दररोज रात्री १ वाजेपर्यंत पिकाचे राखण करत असतो गुरुवारी रात्री सुद्धा आम्ही त्याठिकाणी होतो एक वाजल्याच्या नंतर आम्ही तेथुन निघुन गेल्यावर या अज्ञातांनी पाळत ठेऊन हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान केले. यात आमचे अंदाजे १५ ते २०हजार रुपयां पर्यंत नुकसान झाले असुन जे फळ ५० दिवसाचे व मोठे झाले होते तसेच वीस दिवसांत ते विक्रीसाठी उपलब्ध होणार होते त्यांचेच नुकसान करण्यात आले आहे.

तसेच त्यांनी कलिंगड खाण्याच्या उद्देशाने कापले नसुन हा प्रकार जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने करण्यात आला असल्याचे आमचे मत आहे. काकडे यांच्या घरातील सदस्यांनी सांगितले की कलिंगडाचे पीक आम्ही प्रथमच घेतले असुन आता पर्यंत त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. काकडे यांनी सदर घटनेची तक्रार पिंपळवंडी पोलीस स्टेशनमध्ये दिली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT